Ticker

6/recent/ticker-posts

कळंब जिल्हा यवतमाळ येथे दिव्याग शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार एडिप  तपासणी व नाव नोंदणी शिबिरा अंतर्गत यवतमाळ येथे माननीय खासदार भावनाताई गवळी यांनी अनेक अपंगाची विचारपूस करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व भूतकाळामध्ये जसा अपंगांना त्रास झाला तसा भविष्यामध्ये होणार नाही याची ग्वाही खासदार भावनाताई यांनी दिली तसेच जे दिव्यांग बांधव आहेत त्यांना होणारा त्रास त्यांना न मिळणारी  आर्थिक मदत तसेच मतिमंदना सुद्धा शासनाच्यामाध्यमातून आर्थिक स्वरूपात मदत व्हावी याच्याकरता प्रयत्न करण्याच आश्वासन खासदार भावनाताई गवळी यांनी दिले दिव्यांगाचा जो क्राईट एरिया 80 टक्के  वरून तो 50 ते 60 टक्के पर्यंत असावा जेणेकरून दिव्यांगाना मिळालेली मोटराईजट्रायसिकल असेल किंवा दुसरे दिव्यांगाचे  साधन असेल तर तो चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग करू शकेल या कार्यक्रमाला प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते त्यामध्ये बिडिओ  गटशिक्षणाधिकारी व समाज कल्याण अधिकारी सुद्धा उपस्थित होते तसेच शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते


Post a Comment

0 Comments