Ticker

6/recent/ticker-posts

*मालेगाव येथे अवैध गुटखा साठवणूक/विक्री करणाऱ्यावर धाड ; ९.८४ लाखांचा मुद्देमाल जप्त.*



 नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असूनदेखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, विक्री व वाहतूक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी दिले आहेत.

     त्या अनुषंगाने दि.२६.०१.२०२३ रोजी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते यांच्या पथकाने महाराष्ट्र शासनाकडून प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा पो.स्टे.मालेगाव हद्दीतील भेरा रोडवरील मयूर इलेक्ट्रॉनिक्स समोरील गोडाऊनमधून ०९,८४,०४०/- रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री.अमर मोहिते यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या मिळालेल्या माहितीच्या आधारे मालेगाव येथील भेरा रोडवरील मयूर इलेक्ट्रॉनिक्स समोरील बंडू उर्फ नंदलाल नारायण यादव, रा.जाट गल्ली, मालेगाव यांच्या मालकीच्या गोडाऊनवर छापा टाकून कारवाई केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल, बाजीराव, पान बहार, आर.एम.डी., राजनिवास कंपनीचा गुटखा/तंबाखूजन्य पदार्थ असलेला एकूण ०९,८४,०४०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर आरोपीविरुद्ध पो.स्टे.मालेगाव येथे अप.क्र.२२३/२३, कलम ३२८,२७२,२७३,१८८ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.

     सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांचे मार्गदर्शनात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक यांचे सोबत मपोउपनि.सारिका नारखेडे, पोहेकॉ.प्रेमदास हनमूल, पोकॉ.अमोल कांबळे, रोशन राठोड, मपोकॉ.अर्चना जाधव यांनी पार पाडली. सर्व जनतेस सुजाण नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती द्यावी त्या इसमाचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालय, वाशिम.

Post a Comment

0 Comments