Ticker

6/recent/ticker-posts

. करुणेची मूर्ती माता रमाई...*


 रमा माऊली तू माऊली दलितांची सोसलेस कष्ट भिमासाठी माऊली तू प्रेरणा भीमाची.....

             भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व कायदे पंडित, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात थोर कार्यात सुशील, कर्तव्यदक्ष, शालिनीतेची आणि विनम्रतेची मूर्ती माता रमाई.  या त्यांच्या धर्मपत्नीचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचा त्याग महान होता.  रमाईच्या त्यागामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याला गती आणि आकार आला. रमाईमुळे त्यांना प्रेरणा मिळाली. माता रमाईने आपल्या आयुष्याचा क्षणक्षण आणि शरीराचा कणकण डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्कार्याला वाहिला ,खर्च केला म्हणूनच डॉ. बाबासाहेब यांनी संसाराचा भार रमाईवर सोपवून बहुजन हिताचे कार्य वादळाप्रमाणे करत राहिले. माता रमाईन आपल्या पतीला याकरिता कधीच अडविले नाही. भांडली नाही, रुसली नाही उपाशी जीवन जगली तिला वेळेवर वस्त्र साडी चोळी दाग दागिने मिळाले नाही. तरीही पतीच्या समाजकार्यात रमाई कधीच आडवी आली नाही .अशा सर्व गुण संपन्न सद्गगुणी, करुणामयी माता रमाई चे जीवन. आज इतिहासात ज्या थोर स्त्रिया होऊन गेल्या त्यामध्ये माता रमाई उठून दिसते. माता रमाईच्या त्यागामुळे ,आधारामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशातील कोटी कोटी जनतेला स्वाभिमानाची शिकवण देऊ शकले .

चैनीचा त्याग करुनी

 उच्च शिक्षणाची आस धरुनी दिनदुखी त्याचे दुःख दूर करतील बहुजन समाजाला उद्धारतील!!

  माता रमाईने आपल्या साऱ्या आकांक्षा सुख इच्छा भावना यांचे बलिदान करून त्या लाखो दलितांना आईची प्रेम व ममता दिली आणि कोटी कोटी दीन दुःखितांची  आई ठरली .आई जशी मुलांची काळजी घेते त्याचप्रमाणे माता रमाईने डॉ.

 बाबासाहेबांची सेवा केली अशा त्यागी ममताळू, हळव्या मनाच्या रमाई चे जीवन चरित्र नेहमी वाचावे आणि तिचा आदर्श गुणांचे अनुकरण करावे.

        रमाईचा जीवन त्याग आजही आठवला तर काळजाला तीळ पडतो किती मोठा त्याग किती सहनशीलता याला खरोखरच तोड नाही त्यांचे जीवन वाचताना ऐकताना मन भरून येतं वाटते हा त्याग वही सहनशीलता रमाईने कशी प्राप्त केली असेल.

 मोठ्या मनाची मोठ्या धीराची होती रमा!

या माऊलीच्या त्यागाने सुख मिळाले आम्हा!

    माता रमाईच्या संसारात अनेक अडचणी आल्या रमाई संसारी नांदायला आली तेव्हा तिचे वय फक्त नववर्षाचे होते घरात रामजी बाबा थोरले दिल आनंद जाऊ लक्ष्मीबाई रामजी बाबांची बहीण मी राहत्या ही मंडळी होती तर भीमरावांची सावत्र आई जिजाबाई देखील होत्या. असं भरलेलं माता रमाईच कुटुंब होतं संसाराची सर्व जबाबदारी तिच्यावर होती. घरात नवीन असली तरी मीरा आत्या तिच्यावर आईसारखं प्रेम करायची. स्वयंपाक ,व्यवहार ,वागणं ,बसणं सारं काही शिकवत होती. रमाई चे लग्न भीमराव बरोबर झाले असले तरी भिमरायाची खरे लग्न हे विद्येबरोबर झाले होते. रोज घरातला आणि घराबाहेरचा बराचसा वेळ भीमरावांचा अभ्यासात जात असे. भीमरावांचा अभ्यास सुरू असतानाच बाहेर मुलं खेळत आरडाओरडा करत तेव्हा रमाई मुलांना हुसकावून लावत असे. त्यांना शांत अभ्यास करावयास मिळावा याची काळजी घेत असे. रमाला फार अभिमान वाटत असे की आपला पती ज्ञानसंपन्न आहे. या विचाराने ती सुखावून जात असे.

      गुणवान विद्यावान मिळाला पती!

मनात आनंदून जाई ती!

   भीमरावांना बडोद्याचे नरेश सयाजीराव गायकवाड यांनी शिक्षणासाठी मदत केली. परंतु त्या बदल्यात त्यांनी त्या संस्थानात नोकरी करावे असे ठरले .म्हणून भीमराव त्या ठिकाणी नोकरी लागली. परंतु तिथे त्यांना जातीयता आणि अस्पृश्यतेच्या झळा सोसाव्या लागल्या आणि त्याचवेळी रामजी बाबा खूप आजारी असल्याचे त्यांना पत्र आले .हे ऐकून दुःखी झाले कार्यालयात रजा घेऊन आणि गाडीत बसले. गाडी सुरतला आली बाबांसाठी बर्फी घ्यावी म्हणून खाली उतरले गाडी निघून गेली भीमरावांना पोहोचण्यासाठी उशीर झाला .घरी आल्यानंतर रामजी बाबा डोळ्यात प्राण आणून भीमरावांची वाट पाहत होते. भीमरावांना पाहता क्षणी त्यांनी प्राण सोडला .सारे आंबेडकर कुटुंब दुःख सागरात बुडाले होते. भीमरामाच्या संसाराचे खरेचक्र हरवले होते वडिलांच्या निधनाने दुःखी असताना भीमरावांना अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी प्रवेश मिळाला भीमराव बोटीने अमेरिकेला जातात तेव्हा त्यांना निरोप देण्यासाठी रमा सुद्धा जाते. जड अंतकरणाने त्यांना निरोप देते .आपल्या पतीचा प्रवास सुखकर व्हावा अशी मनोकामना करते. ज्या बोटीने भिमराव प्रवासाला निघतात त्या बोटीच्या नावाड्याला मनोमन रमा म्हणते...

पाठीराखा माझ्या बंधुराया

तू या नावेचा नावाडी

सुखात नेरे माझ्या साहेबांची होडी

अहो गेल्या गेल्या साहेब

 तुम्ही पत्र मला लिहाल का 

सुखदुःखाचे सार काही

त्यामध्ये लिहाल का

सांभाळीन घर मी जीव लावूनी

या लवकर तुम्ही ज्ञानी होऊनी

चिंता आमची करू नका हो मजवर विश्वास ठेवा.

दाही दिशा ला आपल्या कुळाचे नाव धनी गाजवा!

     भीमराव अमेरिकेला कोलंबिया विद्यापीठात गेले. इकडे रमाईला संसाराचा गाडा एकटीला ओढावा लागला १९१३ ते १९१७ या काळात माता रमाईने खूप हाल अपेष्टा सहन केल्या .इंधनासाठी तिला वन वन भटकावे लागत होते .संसारासाठी शेण आणून गोऱ्या थापत होती. मोल मजुरी करीत होती. खाण्यापिण्याचे हाल होत होते. भाऊ शंकर बहीण गौरा मिळेल ती मोल मजुरी करत होते. चार ज्वारीच्या भाकरी करून सर्व चिल्या पिल्यांना देऊन राहिलेल्या भाकरीत अर्ध उपाशी पोटी रमा राहत होती. तरीसुद्धा रमाई आल्या प्रसंगाला तोंड देत होती. खचून जात नव्हती अशा गरिबीत तिला झालेली अपत्ये रमेश ,  इंदू गंगाधर, राजरत्न रमाला सोडून गेली .हे सारे दुःख रमाईने पचवली. परंतु भीमरावांच्या शिक्षणामध्ये समाजकार्यामध्ये कोणतीही पारिवारिक अडचण रमाईने येऊ दिली नाही.

 दुःख संसाराची केले डोळ्यात जमा .आजच्या युगात मिळेल का अशी रमा.

१९१७ साली भीमराव सिडने हम कॉलेजला नोकरीला लागले .तेव्हा त्यांना पहिला पगार ४५० रुपये मिळाला .त्यांनी तो रमाईच्या हाती दिला. रमाईने घरात धान्य आणले, पोरांना कपडे घेतली, भीमरावांच्या बहिणी तुळसा, मंजुळा यांना साडीचोळी घेतली. सर्वांसाठी काहींना काही घेतले सर्व पैसे खर्च झाले की परत बाबासाहेबांकडे पैसे मागण्यास गेली.तेव्हा बाबासाहेब म्हणतात रमा एवढे पैसे खर्च करून कसे चालेल !मी कायमची नोकरी करणार नाही .मला पुढच्या शिक्षणासाठी लंडनला जायचे आहे असे म्हणून बाबासाहेबांनी रमाईला फक्त ५० रुपये दिले. तेवढ्यात महिन्याचा खर्च करावा लागेल असे ठरवून रमाईने दीड रुपयाच्या 30 पुड्या बांधल्या. रोजची एक पुडी सोडून ती खर्च करायची .अशा प्रकारचे महिन्याला ४५ रुपये खर्च करायची आणि ५ रुपयाची बचत करायची. हे ५ रू .बाबासाहेबांना त्यांच्या पुस्तकासाठी द्यायची,. अशाप्रकारे काटकसर करून रमाई बाबासाहेबांच्या शिक्षणात मदत करायची . अशाप्रकारे परिस्थितीशी झुंज देत संसार चालवायची रमा.

    माता रमाईने डॉ.बाबासाहेबांना आपल्या संसारी जीवनातून मोलाची साथ दिली. रमाईच्या महान त्यागाला सीमा नाही .त्यांचे मोल कशातच करता येणार नाही .बाबासाहेब दिनदुखी त्यांच्या उद्धारासाठी रात्रंदिवस झटत होते .तर संसाराचा सगळा भार माता रमाई सांभाळत होती .जगातील इतकी त्यागी निष्ठावान सद्गुनी, सत्वशील स्त्री म्हणजे माता रमाई अशा थोर मनाची गुणाची महान त्याग मूर्ती होती रमाई माता. रमाई  माऊलीच्या त्यागाला  जगात तोड नाही .ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राबरोबर अजरावर झाली. कोटी कोटी दलितांचे डॉ. भीमराव बाबा झाले तर माता रमाई झाली. त्यांचे कष्टाचे उपकार फिटणार नाही .

नऊ कोटीच्या उद्धारासाठी त्याग भीमरामाचा 

हा महिमा मिळाला आम्हा तुमच्या पुण्याईचा 

सुख सोयी समाधानाने जगतो आज आम्ही

 तुमच्या कष्टाचे उपकार माऊली फिटणार नाही.

आज माता रमाईच्या स्मृतिदिनी त्यांच्या त्या त्यागाला विनम्र अभिवादन आणि कोटी कोटी प्रणाम 

ज्योती मिलिंद इंगळे 

     *जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी वाशिम*

Post a Comment

0 Comments