Ticker

6/recent/ticker-posts

*ओबीसीच्या कल्याणासाठी आयुष्य खर्ची घालेल* कल्याण आखाडे.



शेलुबाजार प्रतिनिधी दि.२जुन

वयाची गेली चाळीस वर्ष माळी समाजातील सर्वसामान्य घटकाला एकत्र एकत्र करून न्याय हक्कासाठी साठी सावता परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा प्रमाणीक प्रयत्न केला म्हणून आज पक्ष नेतृत्वाने ही जवाबदारी दिली.त्या जवाबदारी च्या माध्यमातून आपले उर्वरित आयुष्यओ.बी.सी.समाजाच्या कल्याणासाठी खर्ची घालणार असल्याचे प्रतिपादन कल्याण आखाडे यांनी शुलबाजार तालुका मंगरूळ जिल्हा वाशिम येथील त्यांच्या सत्कार प्रसंगी उत्तर देताना काढले.

राष्ट्रवादी काँग्रेस ओ.बी.सी.सेल प्रदेश अध्यक्ष पदी कल्याण आखाडे यांची निवड झाल्याबद्दल शेलुबाजार येथे सावता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासोबत मयूर वैद्य सावता परिषद प्रदेशाध्यक्ष ,प्रा.डाॕ.राजीव काळे प्रदेश प्रवक्ते, गणेश दळवी प्रदेश सरचिटणीस उपस्थित होते. यावेळी उपस्थित त्यांच्या सत्कार करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावित सावता परिषद उपाध्यक्ष पांडुरंग कोठाळे यांनी केले , नंतर मयूर वैद्य यांनी आपले विचार मांडले.त्यानंतर आपल्या सत्काराला उत्तर देताना वरिल प्रमाणे कल्याण आखाडे यांनी आपले विचार मांडले.

कार्यक्रमाला सम्राट डोंगरदिवे जि.प.सदस्य अकोला, दौलत इंगोले जि.प.सदस्य वाशिम, गणेश पवार प.स. सदस्य, सोबतच लक्षमण निखाडे,सावता परिषद युवा जिल्हा अध्यक्ष, श्रीकृष्ण बोळे. जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी ओ.बी.सी.सेल,प्रविण निदान,चंदन राऊत,नाना मेहर, मंगेश तांबडे, गोविंद भेराणे,संजय अवगण , बाजार समिती संचालक,रवि राऊत रा.यु.काॕ जिल्हा उपाध्यक्ष,मयुर ठाकरे रा.यु.काॕ.तालुका अध्यक्ष, सरपंच बाबाराव पवार, रमेश पवार धर्मराज बिडकर,जय गुप्ता,ज्ञानेश्वर मुखमाले अध्यक्ष धनगर महासंघ,राम राऊत अध्यक्ष तैलीक महासंघ,सुरज ठाकरे,सुरज हांडे, संतोष पाटील, समाधान राऊत ,सुदाम मांगुळकर,रुशी पवार,राजु राउत,जलील खान,सादीक शा, गोपाल गोंदमले, विनोद आगळे, गणेश आगळे, राजेश आगळे, रुशीकेश सरदार ,विजय बेलदार,हरिश पवार, पत्रकार पवन राठी, अशोक राऊत सह सावता परिषद व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्र संचालन अतिश पाटील चौधरी यांनी तर आभार राम सुर्वे यांनी मांडले. कार्यक्रमाचे आयोजन पांडुरंग कोठाळे सावता परिषद प्रदेश उपाध्यक्ष यांनी केले.

Post a Comment

0 Comments