Ticker

6/recent/ticker-posts

*माझी माती , माझा देश अंतर्गत विविध कार्यक्रम*

 


**वाशिम प्रतिनीधी*वैभव पायघन* 

तालुक्यातील अंजनखेडा ग्रामपंचायत च्या वतिने माझी माती, माझा देश अभियान अंतर्गत १६ आँगस्टपर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे . या कार्यक्रमांतर्गत १३ आँगस्टला शिलाफलकांचे अनावरण ध्वजारोहण व राष्ट्रगीत, पंचरण शपथ व सैनिक पालकांचा सत्कार व ७५ वृक्षाची लावगड मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सुरेशभाउ कापसे हे होते तर या कार्यक्रमाला उपस्थित उपसरपंच नर्मदा पायघन , ग्रामपंचायत सदस्य शोभा वाकुडकर , वैभव पायघन, मुरलीधर पायघन, देवकाबाई पायघन, दुर्गाबाई पायघन, वर्षाबाई वाकुडकर, ग्रामसेवक संतोष वाकुडकर, ग्रामपंचायत कर्मचारी रंचित भाउ आँपरेटर गोरे मँडम जिल्हा परिषद शाळेचे मुख्खाध्यापक आरु सर व शिक्षीका अंगणवाडी सेविका शाळेतील सर्व विद्याथी व मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी आदीची कार्यक्रमाला उपस्थिती होती. शासनाच्या मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमाचे आयोजन केले होते .

Post a Comment

0 Comments