*मालेगाव / सुरज अवचार :-*
सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले आग्रही युवानेते, आंबेडकरी चळवळीचे क्रियाशील कार्यकर्ते वसुदेव कांबळे यांची वंचित बहुजन आघाडी जउळका सर्कल अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय नेत्या मा.प्रा. अंजलीताई आंबेडकर यांच्या हस्ते व जिल्हाध्यक्ष डाॅ गजानन हुले ,जिल्हा महासचिव सोनाजी इंगळे, रिसोड विधानसभा प्रभारी पारितोष इंगोले तालुकाध्यक्ष सारनाथ अवचार ता,महासचिव राजु जमधाडे ता. सचिव राहुल कांबळे, ता, उपाध्यक्ष कैलास ढाले यांनी सदरील निवड पुष्पगुच्छ देउन केली आहे.
वसुदेव कांबळे हे सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असणारे आग्रही कार्यकर्ते आहेत. समाजातल्या सर्व स्तरातील लोकांसाठी आग्रही भूमिका घेऊन त्यांच्यावरील अन्याय अत्याचार जाब विचारण्यासाठी ते सतत आग्रही असतात. त्याच बरोबर अनेक विधायक सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा विषयक कार्यक्रम व उपक्रमांचे ते आयोजन करीत असतात. चांगले संघटन कौशल्य त्यांच्याकडे असल्यामुळे युवकांचे फार मोठे संघटन त्यांच्याबरोबर असते यामुळे वंचित बहुजन आघाडी जउळका सर्कल मध्ये वाढली जाणार असल्याच्या चर्चा आहेत वसुदेव कांबळे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या निवडी नंतर वसुदेव कांबळे यांनी मालेगाव प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सांगितले कि, माझे काम पाहून मला संधी देण्यात आली आहे. तसेच जउळका सर्कल मध्ये पक्षाचे काम अतिशय जोमाने करणार आहोत व कार्यकर्त्यांची फोज उभा करणार व येणाऱ्या निवडणूका मध्ये मोठ्या ताकतीने उतरणार आहोत आणि वंचित बहुजन आघाडीचा झेंडा जउळका सर्कल व मालेगाव तालुक्यामध्ये फडकवून आद, ऍड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे हात मजबूत करणार आहे असे वसुदेव कांबळे यांनी सांगितले आहे .
0 Comments