पोस्टे वाशिम ग्रामिण हद्दितील आडोळी ते वाळकी मांझरे एकुण ३५ पोल वरिल १८० मिटर विद्युत तार कोणी तरी अज्ञात चोराने चोरून नेला असल्याने अप क ३५५/२४ कलम १३६ भारतीय विद्युत अधिनियम नुसार गुन्हा नोंद करण्यात आला सदर गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करत असताना गोपनिय माहिती व तांत्रिक तपास वरून आरोपी बाबत माहिती मिळाली सदर बाबत अधिक तपास असता असे समझले की दि ०५/०९/२०२४ रोजी चोरीतील अल्युमिनीयम तार हा बोलेरो पिकअप गाडीत टाकुन वाशिम येथुन बाहेर गावी घेवुन जात आहेत त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने शितापीने सदरचे वाहन वाशिम येथुन ताब्यात घेतले असता वाहनामध्ये चोरीच्या मुद्येमाल आणि ०१) शेख हक्कीम शेख मुनाफ वय ४० वर्ष रा. घरकुल कुषी उत्तपन्न बाझार समिती बाजुला वाशिम जि. वाशिम ०२) दशदथ अशोक अडागळे वय ३६ वर्ष ३) विजय बडु बघे वय २६ वर्ष ४) विकांत प्रशांत वाकोडे वय २४ वर्ष तिघे रा. हिवरखेड ता. खामगाव जि. बुलढाणा यांना ताब्यात घेतले. सदर आरोपीची कसोशीने चौकशी केली असता त्यांनी वाशिम जिल्हात पोस्टे वाशिम शहर, वाशिम ग्रामिण, मंगरूळपीर, व कारंजा ग्रामिण च्या हद्दित इतरही विद्युत अल्युमिनीयम तार चोरी केल्या बाबत कबुली दिली त्यांच्या कडुन चार गुन्हयातील ३,००,००० रू किमंतीचा तार व ३,००,००० रू किंमतीचे वाहन असे एकुण ६ लाख रूपये किमंतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कार्यावाही ही पोलीस अधीक्षक मा.श्री. अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे पोलीस निरीक्षक श्री. रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश धोत्रे पोहेकॉ संतोष कंकाळ, दिपक सोनोने, अशिष बिडवे नापोका ज्ञानदेव मात्रे, प्रविण राउत पोकों विठ्ठल महले, दिपक घुगे, अमोल इरतकर, अविनाश वाढे चालक गजानन जाधव, संदिप डाखोरे स्थागुशा यांच्या पथकाने पार पाडली.
0 Comments