पिंप्री अ --- दिनांक ६ मे २०२३ रोजी स्व.मधुकरराव ल.सपकाळ कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय पिंप्री अ तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा-मंगरुळनाथ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीनंतर पुढील शिक्षणाच्या वाटा, वेगवेगळ्या शाखेतील उपलब्ध शिक्षणक्रम, त्याचप्रमाणे विविध क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी व त्याला उपयुक्त असणारे शिक्षण व विविध शिष्यवृत्ती या संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने पिंप्री अवगण परिसरातील विविध प्रकारचे विद्यार्थी या शिबिरासाठी उपस्थित होते. विविध विद्यार्थ्यांच्या शंका, समाधान याविषयी या शिबिरामध्ये निराकरण करण्यात आले. शिबिरासाठी अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव/प्राचार्य प्रा सुनील मधुकरराव सपकाळ उपस्थित होते. प्रमुख वक्ते म्हणून यशवंतजी महाजन त्याचप्रमाणे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वाशिम जिल्हा संघटन मंत्री योगेशजी शेळके हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. या शिबिरामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील संधी व त्याच्या वाटा याविषयी सखोल मार्गदर्शन श्री महाजन यांनी केले.
त्याचप्रमाणे राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राचार्य सुनील सपकाळ यांनी केले त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन श्री बळीराम राठोड सर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
0 Comments