कारजा प्रतिनिधिक कारंजा पोलीस स्टेशन शहर पोलिसानी अनेक चोरीचा यशस्वी शोध घेत अनेकना आपल्या मूल्यवान वस्तु ज्यात महागड़े मोबाइल,सोने,चांदी ,मोटर सायकल परत मिडुन मूल मांलकला दिल्या आहेत अशिच मोदरसैकल पुसद येथुन मिलविली आणि परत केल्याने पोलिसन प्रति विश्वास आणि आदर निर्माण होताना दिसत नुकती च कारंजा शहर जि.वाशिम येथे दि. १४मार्च रोजी फिर्यादी मोहम्मद खालीद मो. असलम नगरीया रा. काजी प्लॉट कारंजा लाड जि.वाशिम. यांनी पो.स्टे. कारंजा शहर येथे जबानी रिपोर्ट दिला की, त्यांचे मालकीची मो.सा. क्र. एम. एच. ३७ एस ७०४० ही त्यांचे घरासमोर दि. १४मार्च रोजी उभी करून ठेवली असता दि. १५ मार्च वे रात्री दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने सदर ची मो.सा. चोरून नेली अशा फिर्यादीचे जबानी रिपोर्ट वरून अप.क्र. १५६/२३ कलम ३७९ भां.द.वि. प्रमाणे अज्ञात आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्हयाचे तपासादरम्यान सदर ची मो.सा. पो.स्टे. वसंतनगर, पुसद येथील गुन्हयात जप्त करण्यात आली आहे. अशा माहीतीवरून नमुद गुन्हयातील आरोपी यांचा शोध घेणे कामी मा. पो. नि. सा. श्री आधारसिंग सोनोने सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ खोलश्वर खुपसे , पोलीस नाईक उमेशकुमार बिबेकर,पोकॉ नितीन व होमगार्ड च्या मदतीने पो.स्टे. वसंतनगर, पुसद परीसरातील नमुद आरोपी असल्याची माहीती मिळाल्यावरून त्यांचा कसोटीने शोध घेवून त्यांना अटक करण्यात आली तसेच नमुद गुन्हयातील मो.सा. पो.स्टे. वसंत नगर पुसद येथुन हस्तगत करण्यात आली.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री बच्चनसिंग साहेब जि.वाशिम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदिश पांडे साहेब, तसेच पो.नि. श्री आधारसिंग सोनोने, यांच्या मार्गदर्शनात पोहेकॉ खोलेश्वर खुपसे,,पोलीस नाईक उमेशकुमार बिबेकर, पोकॉ. नितीन पाटील यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस नाईक उमेशकुमार बिबेकर करीत आहेत.

0 Comments