मंगरूळपीर मृदा व जलसंधारण या विभागा मार्फत नदी नाले खोलीकरण माथा ते पायथा मुख्यता या तत्त्वावर सिमेंट काँक्रीटचे, व्दार युक्त बंधारे, कोल्हापुरी बंधारे हे नद्यांवर बांधून तेथील पाणी अडवून जमिनीचे पाण्याची पातळी वाढवण्याचे कार्य मुख्यता या विभागामार्फत केले जातात जेणेकरून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या हंगामात या पाण्याचा उपयोग करता यावे करिता शासनाने मृदा व जलसंधारण या विभागाची स्थापना केली मात्र मंगरूळपीर तालुक्यातील जलसंधारण विभागाचे काही वेगळीच चित्र दिसून येतात शहरातील एकाच ठिकाणी असलेले लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालयाचे नाव तसेच जलसंपदा विभागाच्या कार्यालयाचे नावे ही स्पष्ट दिसून येतात मात्र जलसंधारण विभाग शोधायचे म्हटले तर त्या फलका वरचे नाव ओळखणे कठीण जाते मग हे कार्यालय कोणते समजावे गधे घाटाचे की मृदा व जलसंधारण विभागाचे शासकीय कार्यालय समजावे असा प्रश्न या ठिकाणी कामागर्जी येणार्या नागरिकांना भेडसावतो.
अशाच कामासाठी शासन हे वेळोवेळी प्रत्येक शासकीय कार्यालयास साधील निधी पुरवितो जेणेकरून त्यांना कार्यालयाचे डाग डुजीकरण करणे शक्य होईल परंतु उपविभागीय जलसंधारण अधिकारी हे आपल्या पदाचा गैरवापर करून या साधील निधीचा अयोग्य ठिकाणी वापर करतात हे या मृदा व जलसंधारण विभागाचे फलक पाहता असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
0 Comments