छत्रपती संभाजीनगर व्हॉईस ऑफ मीडियाच्या साप्ताहिक विंगचे एकदिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन रविवार, १८ जून २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरातील विनोबा भावे हॉलमध्ये होत आहे. जर्नालिझम डिपार्टमेंट एमजीएम कॅम्पस येथे सकाळी १० ते सायंकाळी पाचपर्यंत या अधिवेशनाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन राजर्षी शाहु परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके, व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के उपस्थित राहतील. प्रमुख उपस्थिती म्हणुन ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ प्रा. सुरेश पुरी, ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे, ज्येष्ठ पत्रकार जयंत महाजन, एमजीएम महाविद्यालय पत्रकारिता विभागाच्या प्राचार्य डॉ. रेखा शेळके, व्हॉईस ऑफ मीडिया रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद, मराठवडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब घोडे, शिवाजी बनकर पाटील उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणुन रेडिओ विंगचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सचिन मेनकुदळे मराठवाडा विभागीय सरचिटणीस शेखलाल शेख, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरे, छत्रपती संभाजीनगरच्या साप्ताहिक विभागाचे अध्यक्ष अब्दुल खय्युम अब्दुल रसीद, मराठवाडा संघटक किशोर महाजन काम पहात आहेत. या अधिवेशनात साप्ताहिकाच्या पत्रकारांना विमा पॉलिसीचे वितरण करण्यात येणार आहे. याशिवाय राज्यभरातील १५ पत्रकारांचा गौरवही करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राज्यभरातील साप्ताहिक विंगच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments