Ticker

6/recent/ticker-posts

*ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान*

.शेलुबाजार/


महसूल मंडळांतर्गत येत असलेल्या गोगरी हीरंगी खेरडा परिसरात 14 जुलै रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे पाऊस एवढा जोरात होता की नदी नाले तुडुंब भरल्यामुळे येणाऱ्या मुसळधार पावसाला पात्रात घेत नसल्यामुळे नाले बांधबंधिस्त फूटपाट होऊन  शेताचे प्रचंड नुकसान झाले जमीन खराडल्यामुळे पिके ही उध्वस्त झाली या अस्मानी संकटामुळे नूस्कान ग्रस्त शेतकरीच नव्हे तर शेतकरी- कुटुंब सुद्धा मानसिक दृष्ट्या खचले हतबल झाले म्हणून नुकसानग्रस्तांचे त्वरित सर्वे करून त्यांना शासन स्तरावरून आर्थिक मदत देण्यात यावी असे नुस्कान ग्रस्त शेतकऱ्यांसमवेत भाजपा किसान मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद पाटील जाधव यांनी महसूल अधिकारी मा तहसीलदार यांना सांगितले निवेदन देतेवेळी गोगरी हीरंगी खेरडा परिसरातील नुकसान ग्रस्त शेतकरी होतेमाननीय तहसीलदार यांनी तात्काळ तालुक्यातील सर्व महसूल मंडळ अधिकाऱ्यांना सर्वे करण्याचे आदेश फोनवरून दिले व तात्काळ अहवाल सादर करण्याचे सांगितले

Post a Comment

0 Comments