Ticker

6/recent/ticker-posts

*भूमिहीनांना जमीन मिळालीच पाहिजे यासाठी समाज क्रांती आघाडी आक्रमक*

धनज बुद्रुक/


येथे समाज क्रांती आघाडीच्या वतीने भूमिहीनांना जमीन मिळालीच पाहिजे यासाठी आक्रमक भूमिका घेतली. सहा वर्षांपूर्वी शासनाच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वावलंबन व स्वाभिमान योजना या अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रा मधील भूमिनांचे अर्ज भरून घेतले होते. ज्यांच्याकडे जमीनच नाही त्यांना उदरनिर्वाहसाठी शासनाच्या मार्फत ही योजना राबविण्यात आली परंतु जमीनच शिल्लक नाही या सबीबी खाली जमीन विकणाऱ्यांचे आमच्याकडे अर्ज प्राप्त झाले नाही असे वेगवेगळे कारणे सांगून लाभार्थींना या योजना पासून अलिप्त राहावे लागले. अर्जधारक ज्यांनी या योजनेमध्ये जमीन मिळावी यासाठी अर्ज केले होते ते  अर्ज कर्ते समाज क्रांती आघाडीचे अध्यक्ष हंसराज शेंडे यांच्याकडे पोहोचले त्यावरून हंसराज शेंडे यांनी ते प्रकरण उचलून धरले आणि आयुक्तांशी चर्चा करून भूमिहीनांना जमीन कशी उपलब्ध होईल यासाठी चर्चा केल्यानंतर समाज कल्याण आयुक्त आणि वाशिम जिल्ह्यातील सहाही तालुक्यामध्ये. गटविकास अधिकाऱ्यांना आदेशित करून प्रत्येक गावागावांमध्ये दवंडी देऊन जमीन विकणाऱ्यांची अर्ज प्राप्त करून घ्यावेत अशा प्रकारची दवंडी प्रत्येक गावात दिल्याने जमीन विक्रेता व जमीन खरीद दार यांची जवळीक होईल. भूमिहीनांना कसण्यासाठी मालकीची जमीन मिळेल. प्रस्ताव समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांनी मांडल्यावरून त्याची कृती झाली. गटविकास अधिकाऱ्यांनी दवंडी दिली की नाही यासाठी समाज क्रांती आघाडीच्या वतीने वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण गटविकास अधिकाऱ्यांना त्या संदर्भात निवेदन देण्यात आली आणि समाज कल्याण अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी अशा प्रकारची मागणी रेटून धरली. वाशिम जिल्ह्यामधील संपूर्ण गावागावात जर दवंडी झाली नसेल तर संबंधित गटविकास अधिकाऱ्यांना तशा प्रकारचे स्मरण देऊन समाज क्रांती आघाडीने आपणास दिलेल्या निवेदनावरून आपण काय कारवाई केली सरपंच आणि ग्रामसेवक यांना तशा सूचना दिल्यात का अशा प्रकारच्या प्रश्न गटविकास अधिकाऱ्याला कार्यकर्त्यांनी विचारावा असेही सूचना समाज क्रांती आघाडीच्या वतीने कार्यकर्त्यांना देण्यात आल्या. समाज क्रांती या गाडीने भूमिनांचे प्रश्न, अतिक्रमणाचे पट्टे मिळाले पाहिजे हा प्रश्न, घरकुलाचे प्रश्न, गायरानाचे प्रश्न मागील अनेक वर्षापासून उचलून धरले होते, त्याचा परिणाम असा झाला की अनेक लोकाला त्यांची जमिनीचे पट्टे अतिक्रमण धारकांना समाज क्रांती आघाडीने मिळवून दिले आता ज्या लोकांचे अतिक्रमण 2022 पर्यंत आहेत त्या सर्वांनाच मालकीचे पट्टे मिळावेत यासाठी मग ते गायरानाची असो, अतिक्रमण केलेल्या रहिवासीचे असो, इ क्लास  वरील असो. हे सर्व प्रश्न सरकारकडे वेळोवेळी आंदोलने करून समाज क्रांती आघाडीने मांडलेले आहेत, आता भूमिहीना ना त्यांना जमिनी मिळेल यासाठी मागील दोन वर्षापासून कार्य सुरू आहे जोपर्यंत दोन्हींना त्यांच्या मालकीची जमीन मिळत नाही तोपर्यंत समाज क्रांती आघाडी स्वस्थ बसणार नाही त्यासाठी आंदोलने मोर्चे निदर्शने करावे लागले सरकारवर ज्या पद्धतीने दबाव आणता येईल मग तो जनतेचा दबाव असो की कायद्याचा दबाव असो हे दोन्ही प्रकारचे आंदोलन आता समाज क्रांती आघाडी छेडणार. त्यासाठी   जनतेला आव्हान केले की जेव्हा तुमच्या हक्कासाठी तुम्हाला रस्त्यावर यावें लागेल तेव्हा तुम्ही सज्ज राहावे असे आव्हान समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज शेंडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये केले यावेळी मिलिंद पाटील, समाज क्रांती आघाडीचे राज्य कार्यकारिणी सदस्य विजय वानखडे ,डॉक्टर चंदनशिवे, माजी सरपंच सुदर्शन थोरात, अण्णा सुरजुसे, विशाल a a अगमे, देवेंद्र अटक, भारत खैरे, विविध गावातील भूमिहीन नागरिक. याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यामध्ये सभेचे आयोजन करण्यात येईल. अशीही हंसराज शेंडे यांनी सांगितले.

,

Post a Comment

0 Comments