*मालेगाव / सुरज अवचार :-*
वैद्यकीय व्यवसाय क्षेत्रामधील आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोसिएशन च्या पुन्हा एकदा वाशिम जिल्हाध्यक्ष पदी ...दुबळवेल..येथील एच आर.भागवत कालापाड यांची निवड
वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल व सामाजिक कार्यामध्ये सदा आग्रेसर असणारे कोणाच्याही सुख दुःखात सहभागी असणारे आँक्युथेरपिस्ट एच.आर भागवत नारायण कालापाड यांची आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोसिएशन चे व्हाइस चेयर मन डॉ. नितीनराजे पाटील यांनी पुन्हा नियुक्ती पत्र देवून केली आहे.
आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन संपुर्ण देशात कार्यान्वित असणारी ग्रामीण तसेच शहरातील डाॅक्टरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे देशातील सर्वात मोठी आयुष संघटना आहे.
डॉक्टरांना डाॅक्टरांवर होणार्या अन्यायावरती त्वरीत मदत करणे, डॉक्टरांना वैद्यकीय कायद्याविषयी मोफत सल्ला देणे अदी काम आयुष इंटरनॅशनल मेडीकल असोसिएशन करते .
डाॅक्टर व रुग्ण यांचे शासकीय दरबारी प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध राहु असे फेरनिवडीनंतर एच.आर. भागवत कालापाड यांनी सांगितले.
0 Comments