मंगरुळपिर तालुक्यातील हिरंगी येथे दि 14 जुलै रोजी आरोग्य तपासणी व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाची सुरुवात सर्व तज्ञ डॉक्टरांना पुष्पगुच्छ देऊन करण्यात आली शिबिरा मध्ये एकूण 70 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून सोबतच रुग्णांची मोफत शुगर व बीपी तपासणी तसेच ECG करण्यात व गरजू रुग्णांना मोफत औषद वाटप करण्यात आली.
अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला, आरोग्यसेवा आपल्या दारी या डॉ. देवळे सर यांच्या संकल्पनेतून शिबीर आयोजित केले होते शिबीर यशस्वी करण्यासाठी डॉ. सिद्धार्थ देवळे,डॉ.पुरुषोत्तम नरवाडे सर , डॉ. साजिद खान सर , डॉ.व्यवहारे सर ,नितीन बनसोड यांनी सहकार्य केले व शिबिराचा आयोजनसाठी रुग्णसेवा युवा ग्रुप हिरंगी येथील सदस्य युवक मंडळी महेंद्र सावके, राहुल सावके, विश्वनाथ सावके, मनोज सावके,अभिषेक सावके व गावकरी मंडळीनी सहकार्य केले सदर शिबिराचे आयोजन रुग्णसेवा ग्रुपचे अध्यक्ष शिवा सावके यांच्या माध्यमातून करण्यात आले होते तसेच मंगरूळपीर तालुक्यात ईतर ज्या गावात रोगनिदान शिबीर घेतले नसतील त्यांनी संपर्क करण्याचे आव्हाहन शिवा सावके यांनी केले.
0 Comments