जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरगाव येथे ड्युटीवर जात असलेल्या शिक्षकास डोक्यावर जबर मारहाण करून ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून देण्याची घटना पो.स्टे.जऊळका हद्दीत घडली होती. सदर घटनेत शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता. सदर प्रकरणातील आरोपी निष्पन्न करून त्यास ताब्यात घेण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
पो.स्टे.जऊळका हद्दीत दि.०९.१०.२०२३ रोजीचे १०.३० वा. ते ११.०० वा.दरम्यान मृतक दिलीप धोंडूजी सोनुने, वय ४५ वर्षे, व्यवसाय - शिक्षक, रा.शेलू फाटा मालेगाव, ता.मालेगाव, जि.वाशिम हे त्यांचे मोटारसायकलने मालेगाव वरून बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ड्युटीवर जात असतांना त्यांना अज्ञात आरोपींनी ग्राम कोल्ही शिवारात डोक्यावर मारहाण करून त्यांचे अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले होते. यामध्ये दिलीप धोंडूजी सोनुने यांचा उपचारादरम्यान शासकीय रुग्णालय, वाशिम येथे मृत्यू झाला. मृतकाचे भाऊ अनिल धोंडूजी सोनुने, वय ४९ वर्षे, रा.बाळखेड, ता.रिसोड, जि.वाशिम यांच्या फिर्यादीवरून पो.स्टे.जऊळका येथे अप.क्र.३०१/२३, कलम ३०२, २०१ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचे प्राथमिक तपासादरम्यान असे आढळून आले आहे कि, यातील मयत दिलीप धोंडूजी सोनुने याचा रामदास सोनुने यांचे सोबत ग्राम बाळखेड, ता.रिसोड, जि.वाशिम येथील शेतीच्या मालकी हक्काबाबत वाद सुरू होता. त्या अनुषंगाने रामदास सोनुने यांचा मुलगा संशयित आरोपी नामे ज्ञानेश्वर रामदास सोनुने याला पुढील तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस वि.न्यायालयासमोर हजर करण्यात येत आहे.
तसेच तांत्रिक पुरावे व मागील वादाचे वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तपास पो.स्टे.जऊळकाचे प्रभारी अधिकारी सपोनि.प्रदीपकुमार राठोड व तपास पथक करत आहे.
0 Comments