शे
लुबाजार .सम्पूर्ण महाराष्ट्र मधे गडकिल्ले स्वच्छता व दुर्गसंवर्धन तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी राजा शिवछत्रपती परिवार ही संस्था सम्पूर्ण महाराष्ट्रात ३० जिल्ह्यात गडकिल्ल्यांची स्वच्छता व संवर्धनाचे काम करते.
दुर्ग संवर्धन मोहिमे बरोबरच रक्तदान शिबिर आयोजन, वृक्षारोपण, दिवाळी ला गड पूजन करने, अनाथाश्रम मदत, वृद्धाश्रम मदत अशा प्रकारचे मदत कार्य सुध्दा हि संस्था राज्यभर करत असते.
संपूर्ण महाराष्ट्रातून मावळे / रणरागिणी स्व खर्चानेे आणि उत्साहाने या मोहिमे साठी येत असतात, त्याच शिवकार्याचा वसा होऊन विदर्भाचाच नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रचा वैभवशाली ईतिहास घेऊन उभा असलेला चिखलदरा येथील पराक्रमी किल्ले गावीलगड या ठिकाणी राजा शिवछत्रपती परिवार (संस्था) यांनी मुख्य मोहिम राबविली आणि किल्ले गावीलगडाला मोकळा श्वास देण्याच मोलाचं कार्य केल, व इतिहास जिवंत केला, चिखलदरा हे विदर्भाचे महाबळेश्वर म्हणून ओळख असणारे पर्यटन केंद्र पुर्ण परंतु पर्यटनाला येत असताना ही दुर्दैवाने किल्ले गाविलगड सारखा अपरिचित राहीला राजा शिवछत्रपती परिवार यांच्या मार्फत जवळ जवळ एक हजार मावळे व रणरागीणी यांच्या श्रमदानाच्या माध्यमातून अपरिचित गावितगड संपूर्ण महाराष्ट्रात पोचला रविवार दि. १७ मार्च २०२४ रोजी सकाळी ७ वाजता राष्ट्रगीत, गडपूजन, आणि शिवराय पूजनाने या मोहीम ची सुरुवात झाली दोन दिवसीय असणारी ही मुख्य मोहीम दि. १६ व १७ मार्च या मध्ये पहीला दिवस श्री क्षेत्र शेगाव येथून श्री संत गजानन महाराज दर्शन व प्रभात फेरी करून १५० कीमी चा प्रवास करून न थकता हे मावळे /रणरागीणी चिखलदरा येथे रात्री पोहचले आणि सकाळी ३ वाजता पासुन मोहीम ची तयारी करत होते खरोखरच हे कौतुकास्पद आहे स्वखर्चाने उत्साहाने हजारो किलोमीटर चा प्रवास करून किल्ल्यावर काम करणे आणि शिव भक्ती काय असते शिव कार्य काय असते हे शिकावे तर राजा शिवछत्रपती परिवार यांच्याकडून या मोहीम साठी सहकार्य लाभलेले शेगाव, परतवाडा, तथा चिखलदरा, नगरपरिषद, प्रशासन, तसेच चिखलदरा वन विभाग प्रशासन,आणि पुरावत्व विभाग यांचे राजा शिवछत्रपती परिवाराच्या वतीने आभार,
0 Comments