*माजी उपपंतप्रधान, ९६ वर्षीय लालकृष्ण अडवाणी भारतरत्न*
देशाचे माजी उपपंतप्रधान व भाजपचे ९६ वर्षीय नेते लालकृष्ण अडवाणी 'भारतरत्न' ठरले आहेत. रविवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सर्वोच्च गौरव केला. या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही उपस्थिती होती. २०१५ मध्ये अडवाणी यांना दुसरा सर्वोच्च गौरव पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले होते. देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असलेला 'भारतरत्न' यंदा पाच जणांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांचे वितरण काल (ता. ३०) राष्ट्रपती भवनात करण्यात आले होते. यावेळी माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह, पी. व्ही. नरसिंह राव, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि कृषी वैज्ञानिक एम. एस. स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे लालकृष्ण अडवानी या कार्यक्रमास हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वतः अडवानी यांच्या निवासस्थानी जात त्यांना हा पुरस्कार दिला माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते रविवारी देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील उपस्थित होते.'आयुष्यभर जपलेल्या आदर्शाचा सन्मान' भारतरत्न पुरस्कार मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहेच; पण ज्या
आदर्श आणि सिद्धांतांची आपण आयुष्यभर सेवा केली, त्या आदर्श आणि
सिद्धांतांचाही हा सन्मान आहे," अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर
म्हणून हा सर्वोच्च गौरव .... लालकृष्ण अडवाणी यांनी आयुष्याची ७० वर्षे
अथक आणि समर्पण भावनेतून देशसेवा केली आहे. भारताच्या सांस्कृतिक उत्थानामध्ये त्यांनी केलेला संघर्ष २०२४ मध्ये अयोध्येतील श्रीराम मंदिर बांधकामाच्या रूपात पूर्ण झाले, असे राष्ट्रपती भवनाच्या सूत्रांनी सांगितले.
0 Comments