Ticker

6/recent/ticker-posts

संस्कार गुरुदेव महिला मंडळाच्या वतीने वृक्षारोपण


प्रतिनिधी बाळू काळे

मंगरूळनाथ प्रतिनिधी :- तालुक्यातील शेलु बाजार येथील संस्कार गुरूदेव महीला मंडळातील सदस्य महिला यांनी पर्यावरणाचा समतोल रहावा व निसर्ग मित्र बणुन व्रुक्षरोपण हाती घेतले व त्याची सुरुवात ही पहिल्या पावसाच्या आगमनाने केली,

     स्थानिक गजानन महाराज संस्थान शेलु बाजार परिसरात शत व्रुक्षरोपण हाती घेत संस्कार गुरूदेव महीला मंडळातील प्रत्येक महिलेला एक झाड लावण्याचा संकल्प करत याची सुरूवात दिनांक १० जुन पासुन करण्यात आली यावेळी योगा प्रशिक्षक लहान मुले व मुली यांनी रोपवन केलेल्या व्रुक्षाची सामुहिक पुजा प्रार्थना करून आराधना केली यावेळी संस्कार गुरूदेव महीला मंडळातील दुर्गा दुगाणे, शालीनी वानखेडे, वैशाली माकोडे, बेबी क्षिरसागर,प्रिती साळवे, शोभा इंगोले,पुजा हरणे, सविता घोडे, शिल्पा हिवराळे, लता येवले, भावना बोबडे,पद्मनी कावळे, सुनंदा लांभाडे,शैला सोळंके,मंदा लांभाडे, सह योगा प्रशिक्षक,शिक्षक राजपूत डांगे, व गजानन महाराज संस्थान पचे विश्वस्त हजर होते

Post a Comment

0 Comments