Ticker

6/recent/ticker-posts

प्रख्यात मॅग्झिन युनिक टाइम्स ने अमोल पाटणकर यांच्या कार्याची घेतली दखल* *जनसेवा आणि सामाजिक हितामुळे प्रशासकीय अधिकाऱ्याच्या कार्यावर प्रकाश*


मानोरा प्रतिनिधी /विशाल मोरे

 मानोरा:- तालुक्यातील तीर्थक्षेत्र कोंडोली येथिल असलेले आणि सध्या गृहविभागात मा. उपमुख्यमंत्री यांचे अवर सचिव म्हणून कार्यरत अमोल पाटणकर यांची जनसेवेप्रती असलेली तळमळ आणि उत्तुंग यशाची शिखरे गाठतांनाही आपल्या जन्मभुमिशी असलेले घट्ट नाते याची दखल घेत नामांकित असलेल्या युनिक टाईम्स या मॅगझिनने दखल घेत त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला आहे.

      कर्तव्यावर असताना सहसा कर्मभूमीकडे लक्ष दिल्या जाते आणि प्रवाहाच्या ओघात जन्मभूमीकडे दुर्लक्ष होते परंतु अमोल पाटणकर यांच्याबाबतीत तसे नसल्याचे याद्वारे अधोरेखित झाले आहे. मुंबईला मंत्रालयात उच्चपदस्थ असूनही आपली जन्मभूमी असलेल्या कोंडोली गावाप्रती आणि वाशिम जील्ह्याप्रती असलेली त्यांची जवळीक त्यांच्या कार्यावरून नजरेस पडते. 

अरुणावती बहुद्देशीय संस्थेद्वारा कोंडोली आणि परिसरातील जनतेची सेवा करण्याचे काम अमोल पाटणकर सातत्याने करीत आहेत. कोंडोली गावाला पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात म्हणुन ते प्रयत्नशील आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे कोंडोली गावाला मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी ७ कोटींचा रस्ता बांधकामाकरीता केंद्रीय रस्ते निधी मिळवून रस्ता महामार्गाला जोडण्यात आल्याने गावात शासकीय वाहनांना व विद्यार्थिनींना यामुळे शहरात जाता येते.

 आध्यात्मिक क्षेत्र असलेल्या कोंडोली येथून वाहत असलेल्या अरुणावती नदीचे जल व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी मोठे विकासात्मक कामे मा.उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात पाटणकर यांनी मार्गी लावले असून ही कामे कोंडोली परिसरात सुरू आहेत.

 मानोरा तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना महागडी वैद्यकीय सेवा परवडत असल्याने शासनाकडून बांधण्यात येत असलेल्या ३० खाटांचे इस्पितळ ५० खाटांचे करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी पाटणाकरांचा पाठपुरावा चालू असल्याच्या कामाची दखल सुद्धा ह्या प्रख्यात युनिक मॅगझीनने घेतली आहे. 

तालुक्यातील गंभीर आजारी व अपघातग्रस्त रुग्णांना जलद वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी अरुणावती बहुउद्देशीय संस्थेमार्फत उपमुख्यमंत्री ना. फडणवीस यांच्या जन्मदिवसाला रुग्णवाहिका पाटणकर यांनी उपलब्ध करून दिल्याचे विशेष उल्लेख मॅक्झिनने केले आहे.

 वाशिम जिल्ह्यातील इतरही तालुक्यांमध्ये लोक कल्याणकारी कामाचा धडाका लावणारा हा अधिकारी केवळ वाशिम जिल्ह्या पुरता मर्यादित नसून राज्यातील कोणत्याही जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्यांचे कायद्याच्या कसोटी वरील कामांसाठी उपलब्ध असणाऱ्या अमोल पाटणकरांच्या कामाची दखल घेऊन ख्याती प्राप्त मॅक्झिनने झळकावल्याने  जन्मभूमी मानोरा तालुक्यातूनच नव्हे तर संपूर्ण वाशिम जिल्ह्यातून मोठे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments