मालेगाव प्रतिनिधी सुरज अवचार :- मालेगाव तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा जउळका येथे पोळा सणाच्या पर्वावर दि, ४ सप्टेंबर रोजी तान्हापोळा उत्साहात साजरा करण्यात आला. मराठी संस्कृती, शेतकरी आणि शेती याविषयी माहिती विदयार्थ्यांना असावी, मराठी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने पोळाच्या पर्वावर सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक राजु बळी तसेच शिक्षक वृंद अनिल सोळंके, ताराचंद वाघमारे, प्रेमाचंद डाखोरे, मन्मथ अब्दुलपुरे, सुरज अवचार , शिल्पा कळस्कर, दिपाली इंगळे, सरोजिनी श्रीरामे हे उपस्थित होते. यावेळी नंदी बैलांचे पूजन करून मराठी गौरव गीत सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमात इयत्ता १ली ते ४ थीचे विद्यार्थ्यांनी शालेय वेशभूषेत आणि आकर्षक नंदी बैल घेऊन सहभागी झाले होते. शाळेतील उत्साही विद्यार्थी शालेय वेशभूषेत शाळेत हजर होते. मराठमोळ्या अंदाजात गित व नृत्य सादर करून सर्वांचे स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांना गोड खाऊ वितरण करण्यात आला.
तान्हा पोळा कार्यक्रमात विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव झाला असून सहभागी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मन्मथ अब्दुलपुरे यांनी केले असून आभार प्रदर्शन प्रेमानंद डाखोरे यांनी केले.
0 Comments