ग्रा.पं.ग्रामस्थांना हक्कापासुन वंचित ठेवत असल्याचा आरोप
पाञ लाभार्थ्यांना योजनेच्या लाभासाठी कटिबध्द असल्याचे ग्रा.पं.चे धोरण
मंगरूळपीर तालुक्यातील नियमाकुल विषय आता चांगलाच गाजत आहे. ग्रामस्थांना त्यांना हक्कापासुन वंचित ठेवल्या जात असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला असुन अतिक्रमीत जागेचा आठ अ मालकीचा न केल्यास आमरण ऊपोषणाचा इशारा लेखी निवेदनाव्दारे सबंधित प्रशासनाला दिला आहे तर दुसरीकडे आम्ही जनतेच्या विकासासाठी कटिबध्द असुन पाञ लाभार्थ्यांनी नियमानुसार अर्ज केल्यानंतर त्यांना योजनेचा लाभ मिळवुन देणे हे ग्रामपंचायतचे धोरण आहे.कुण्याही पाञ लाभार्थ्यांना शासकीय योजनेपासुन वंचित ठेवल्या जाणार नाही असे ग्रामप्रशासनाने सांगीतले आहे. आदर्श गाव म्हणून येडशीला पंचक्रोशीत ओळख आहे.विविध सामाजिक आणी धार्मिक कार्यात गावकरी एकोप्याने भाग घेवुन गावगाडा चालवित असल्याची परंपरा परंतु आता माञ ग्राम प्रशासन आणी काही गावकरी यांच्यामध्ये सध्या लेटर वार सुरु असल्याचे एकंदरीत चिञ दिसते.ग्रामपंचायत विषयीच्या ढिगभर तक्रारीचा खच पाहुन गावच्या विकासाला ग्रहण तर लागले नाही ना अशी शंका व्यक्त होत आहे.सर्व मिळुन आणी ऐकोप्याने गावविकासाला प्राधान्य दिले तर गावचे नंदनवन झाल्याशिवाय राहणार नाही पण येडशीत माञ विकासाला खिळ बसलेली पाहावयास मिळत आहे.काही गावकरी वर्षानुवर्षे अतिक्रमीत जागेत घर बांधुन रहिवास करीत आहेत पण असुनही स्व मालकीची जागा व्हावी यासाठी नियमाकुलची कारवाई हेतुपुरस्सरपणे ग्रामप्रशासन करीत नसल्याचा आरोप करत न्यायासाठी आमरण ऊपोषणाचे हत्यार ऊपसणार असल्याचा इशारा प्रशासनाला लेखी निवेदनाव्दारे दिला आहे.पण दुसरीकडे ग्रामप्रशासन गावविकासासाथी कटिबध्द असल्याचा विश्वास देखील सांगण्यात आला.लोकांना हक्काचे घरकुल मिळावे यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल असुन पाञ लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपञाची पुर्तता करुन अर्ज थर करावेत त्यांना नियमानुसार अतिक्रमीत जागा नियमानुकुल करुन जागेचा आठ अ देणार असल्याचेही येथील सरपंच यांनी सांगीतले.गावकरी आणी ग्रामप्रशासन यामधील हा वाद विकोपाला जाण्याच्या आधी प्रशासनाने वेळीच दखल घेवुन प्रकरणाचा निपटारा करावा अशी सुज्ञ नागरीकांकडुन मागणी होत आहे.
0 Comments