मुंबई.
प्रा इंगोले मुंबईतील एका नामवंत कॉलेजचे प्राध्यापक ते युनिव्हर्सल क्रांतिभूमी फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत
प्राध्यापक ते संस्थेचे अध्यक्ष हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे.या प्रवासात त्यांनी समाजाशी आपली नाळ अधिक घट्ट केली
प्राध्यापक म्हणून असो की संस्थेच्या माध्यमातून असो कुठलेही काम करत असतांना ते समाजाभिमुख असले पाहिजे या विचाऱश्रेणीचे
ते आहेत आपल्या कामाचा जर समाजाला फायदा होत नसेल तर ते काम करायचे कशाला या विचाऱश्रेणीतुन संस्थेच्या गेल्या सात वर्षाच्या वाटचालीत सातत्याने समाजाभिमुख कार्यक्रम राबविली आहेत आणि वाशिम जिल्ह्याच्या कार्यकक्षेत आपल्या सामाजिक कार्याचा दबदबा निर्माण केला आहे
सामाजिक कार्य करत असतांना तात्पुरती मलमपट्टी त्यांना अपेक्षित नाही.तर सामाजिक समस्यावर आपण कायमस्वरूपी उपाय शोधले पाहिजे यावर त्यांचा भर आहे.त्यामुळे त्यांनी अनाथ व निराधार लोकांचे मोफत संगोपन करण्यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील मौजे बेलखेड येथे वृद्धाश्रम तर मानोरा तालुक्यातील मौजे कोल्हार येथे अनाथाश्रम ह्या सेवा सुरू केल्या आहेत.
समाजहिताच्या कार्यामध्ये विघ्नसंतोषी लोक खोडा घालण्याचा प्रयत्न करतात याला प्रा इंगोले यांचे कार्यही अपवाद राहिले नाही परंतु स्वतःवर ठाम विश्वास,परमेश्वरावर अतुट श्रद्धा,आपण समाजाचे देणे लागतो याची जाण,मधुर वाणी,माणसाची अचूक पारख,शैक्षणिक व सामाजिक विकासाची तळमळ,शुद्ध चरित्र ,आणि जिवाभावाच्या माणसांनी दिलेली साथ प्रोत्साहन व आशीर्वाद या शस्त्राच्या जोरावर सर्व संकटे ,अडी-अडचणी, विरोध व विरोधकांवर त्यांनी मात केली आणि आपले ध्येय पूर्णत्वास नेले
अनाथ व निराधाराची सेवा ,शिक्षणं,आरोग्य, अन्याय निर्मूलन, महिला व बालविकास,पर्यावरण आणि जनजागृती यांसारख्या विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल वाशिम जिल्हा समाज गौरव,डॉ.बाबासाहेब आंबेडकर जनहित परिवर्तन, आदर्श शिक्षक-प्राध्यापक असे विविध पुरस्कार त्यांच्या नावे आहेत
अशा या सामाजिक विचारवंतास आज 3 ऑगस्ट रोजी मंगरुळपीर पत्रकार संघटनेकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
0 Comments