वाशीम:मा. पोलीस अधिक्षक अनुज तारे सर, अपर पोलीस अधिक्षक लता फड सहायक पोलीस अधिक्षक नवदिप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात वाशिम पोलीसांची अवैध धंदे, सराईत गुन्हेगार यांच्यावर सतत पाळत ठेवुन चोरी, घरफोडी च्या गुन्हयाची उकल करून गुन्हे उघडकिस आणण्याचे प्रयत्न सतत सुरू असतांना दि.०८/०८/२०२५ रोजी संध्याकाळी ६.०० वा ते ८.०० वा दरम्यान वाशिम शहर, वाशिम ग्रामीण हट्टिमध्ये एकुण ४ ठिकाणी जबरी चोरी झाल्याची माहिती प्राप्त होताच वाशिम शहर, वाशिम ग्रामीण, स्थानिक गुन्हे शाखा व उपविभागीय पोलीस अधिकारी यांची टिम घटनास्थळी पोहचुन फिर्यादी यांना घटनेची माहिती घेतली असता ३ आरोपीतांनी यामाहा आर १५ रेसर बाईक वर येवुन चाकुचा धाक दाखवुन पैसे व मोबाईल जबरीने चोरी केल्याचे सांगीतले त्या वरून चारही ठिकाणी च्या फिर्यादी यांनी आरोपीचे सारखेच वर्णन सांगीतल्याने आरोपीतांचे वर्णन घेवुन गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने मा. पोलीस अधिक्षक सर, अपर पोलीस अधिक्षक मॅडम यांनी घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेताच क्षणाचाहि विलंब न करता पोलीस स्टेशन वाशिम ग्रामीण हदिमध्ये ०३ ठिकाणी घटना घडल्याने व वाशिम शहरात ०१ ठिकाणी जबरी चोरी च्या घटनेसंदभनि वेगवेगळ्या टिम तयार करून घटनेतील आरोपीतांचे वर्णनाप्रमाणे सिसिटिव्ही फुटेज व आरोपीचा मागोवा घेण्यासाठी टिम तयार केल्या त्या मध्ये स्थानिक गुन्हे शाखा वाशिम च्या सपोनि योगेश धोत्रे व टिम, वाशिम ग्रामीण येथील सपोनि श्रीदेवी पाटील व त्यांच्या टिम, वाशिम शहर येथील सपोनि नाईक व त्यांची टिम असे वेगवेगळ्या भागात आपआपल्या माहिती प्रमाणे आरोपीचा शोध कामी रवाना झाल्या त्या मध्ये वाशिम ग्रामीण च्या ठाणेदार सपोनि श्रीदेवी पाटील यांना मिळालेल्या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखा चे सपोनि धोत्रे पोउपनि मास्कर, वाशिम शहर चे सपोनि नाईक अशा टिम अकोला जिल्हयातील आरोपी असल्याचे प्राथमिक माहिती घेवुन रवाना झाल्या वरून बार्शिटाकळी तालुक्यातील सुकळी पैसाळी गावातील आरोपी असल्याचा प्राथमीक माहिती वरून पोनि धुमाळ ठाणेदार बार्शिटाकळी यांचे पथक सोबत घेवुन माहिती प्रमाणे गावातील गाडी व आरोपीचा शोध घेत असतांना माहिती प्रमाणे गाडी एका घरामध्ये उभी दिसल्याने सदर आरोपी याचे घरचे असावे वरील टिम ने घरास वेढा घेवुन घरात प्रवेश केला त्याच क्षणी एक आरोपी हा घरातुन पळून जाण्यास यशस्वी झाला तर इतर दोन आरोपी यांना टिम ने ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) राजु तुळशराम
कांबळे रा.पंचशिल नगर वाशिम २) प्रसिक युवराज जाधव रा. सुकळी पैसाळी ता. बाशिटाकळी जि. अकोला यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी वरील सर्व घटनेची कबुली दिली गुन्हयातील जबरी चोरी गेलेले मोबाईल ०५ व नगदि रोख रक्कम जप्त करण्यात आले. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि संतोष शेटे वाशिम ग्रामीण हे करीत आहेत. सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक लता फड, सहा पोलीस अधिक्षक नवदिप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रदिप परदेशी, पोलीस निरीक्षक देवेद्रसिंह ठाकुर, सपोनि श्रीदेवी पाटील, सपोनि योगेश धोत्रे, अमोल पुरी, सपोनि बाळासाहेब नाईक, पोउपनि शेखर मास्कर, पोउपनि राहुल गंधे पोलीस अमलदार संदिप गायकवाड, निलेश घुगे, प्रविण राउत, प्रविण सिरसाट, प्रशांत वाढणकर, ज्ञानदेव मात्रे, अमोल इरतकर, संदिप दुतोंडे, दिपक घुगे, महोदव भिमटे, उमेश देशमुख, शिवा घुगे, चंदन राठोड, गोपाल चौधरी, संतोष वाघ, वैभव गाडवे, संदिप डाखोरे, संदिप उघडे, शरद कुमरे, भारत योगावाढ सायबर टिम व वाशिम जिल्हा पोलीस यांनी केली.
0 Comments