कारंजा. दि.10 मे रोजी मतदार संघाचाच नव्हे तर वाशिम जिल्हयाचा संघर्षयोद्धा जननायक, विकासाभिमुख लोकनेते माजी आमदार कर्मयोगी स्वर्गीय प्रकाशदादा डहाके यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्य भव्य हृदयरोग निदान शिबीर पांच मे रोजी वेळ 11 ते 3 वाजे पर्यन्त कृषक भवन येथे डॉ नीरज राघानी झेनीत हॉस्पीटल अमरावती यांचे मार्गदर्शनात आयोजीत करण्यात आले होते. तसेच कृ.उ.बा.स. कारंजाच्या निवडणुकीमधे ज्या मतदारांनी व कार्यकत्यांनी विजय मिळवुन दिला त्यांचा आभार प्रदर्शनाचा सुद्धा भव्य सभा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला मतदारसंघातील आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते, सरपंच सेवा सहकारी सोसायटी सदस्य व मतदार हजारोच्या संख्येने उपस्थित होते.वरील कार्यक्रमाला मंचावर हाजी युसुफ सेठ पुंजानी जयकिसन भाऊ राठोड,दत्ता डहाके, बाबारावजी ठाकरे श्रीकृष्ण सोलोकार,,अशोकराव मुन्दे 'सुरेशपाटील गावंडे गोविंदराव चव्हाण,, नेमाणे पाटिल, पं. स. सभापती प्रदीप देशमुख, वसंतरावजी लळे, श्रीमती सईताई डहाके व त्यांचेसोबत निवडुन आलेले सर्वच्या सर्व 18 नवनिर्वाचीत समितीचे संचालक मंडळी उपस्थित होती सर्व मान्यवरांचा कार्यकार्याच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित संचालकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी आपल्या भाषणातून स्व. प्रकाश-
दादांच्या योगदानाचा व जुन्या आठवणीना उजाळा दिला कारंजा तालुक्यात राजकारणात एक वेगळी छाप सोडणारे स्वर्गीय प्रकाश दादा डहाके यांचे 10 मे रोजी वयाचा 68 व्या वर्षी निधन झाले होते आपल्या भाषणातुन हाजी युसुफसेठ पूंजानी व जयकिसन राठोड यांनी या पुढील सर्व निवडणुकीत डहाके परिवाराच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहन्याचा संकल्प व्यक्त केला. श्रीमती सईताई डहाके, देवव्रत डहाके, दत्ता डहाके यांनी सर्वच्या सर्व १८ ही संचालकांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे व कार्यकर्त्यांचे आभार मानले. या प्रसंगी डहाके परिवाराचे सर्व आप्तेष्ट व नातेवाईक सह कार्यकर्ता त्याच बरोबर निवडून आलेले संचालक मंडळ उपस्थित होते. हृदयरोग निदान शिबीरात 103 लोकांनी तपासणी करून लाभ घेतला. कौस्तुभ डहाके यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे आभार मानले.कार्यक्रमा चे सूत्र संचालन प्रा. अनिल मसके व प्रसन्नाभाऊ पळसकर यांनी केले...
0 Comments