चार महिन्याच्या बाळाने आपल्या स्वतःच्या बारशाच्या दिवशीच गिफ्ट मिळालेली सोन्याची मोठी अंगठी बोट चोखताना अचानकपणे गिळली. तब्बल 33 तासानंतर नातेवाईकांनी गाठले नांदेडचे गॅलक्सी रुग्णालय. दिनांक ७ मे 2023 रोजी नुकताच नामकरण झालेल्या एका चार महिन्याच्या बाळाने गिफ्ट मध्ये मिळालेली सोन्याची अंगठी बोट चोखताना अचानकपणे गिळली. आई-वडिलांनी आणि नातेवाईकांनी शोधा शोध घेऊन अंगठी हरवली असा निष्कर्ष काढला. मात्र जवळजवळ 24 तासानंतर बाळाला गिळण्यास त्रास होऊला
गल्याने आईच्या सांगण्यावरून बाळाचा छातीचा एक्स-रे काढण्यात आला. आणि एक्स-रे मध्ये अंगठी अन्ननलिकेच्या वरच्या भागात रुतून बसल्याचे लक्षात आले. मग सगळ्यांचीच धावपळ सुरू झाली. दिनांक 8 मे 2023 रोजी रात्री १० वाजता हे बाळ नांदेडच्या बोरबन परिसरातील गॅलक्सी रुग्णालयामध्ये दाखल झाले. ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. पुरुषोत्तम कलंत्री यांच्या कौशल्यपूर्वक दिल्या गेलेल्या भुलेचा नियंत्रणाखाली गॅलक्सीच्या टीमने ही अंगठी अवघ्या साठ सेकंदात बाहेर काढली. मात्र बराच काळ अंगठी अन्ननलिकेत रुतून बसल्याने अन्ननलिकेच्या नाजूक त्वचेला जखम झाल्याचे आढळून आले. अंगठी बाहेर काढल्यानंतर तासाभराने या बाळाला पाणी देऊन घरी रवाना करण्यात आले. लहान मुलांच्या नातेवाईकांना, आई-वडिलांना आणि आजी-आजोबांना एक नम्र विनंती आपल्या मुलांच्या हातात मोठ्या अंगठ्या, देवाच्या मूर्ती किंवा कुठल्याही धातूच्या वस्तू देऊ नयेत. मुलांनी अशा वस्तू गिळण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. जवळपासच्या परिसरात तज्ज्ञ एन्डोस्कोपी डॉक्टर आणि अत्याधुनिक एंडोस्कोपी उपकरणे नसल्यास अशा वस्तू काढताना रुग्णाच्या जीवास धोका होऊ शकतो हे आपण ध्यानात ठेवावे

0 Comments