Ticker

6/recent/ticker-posts

गावठी दारूअड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड ; १.०५ लाखांचा मुद्देमाल (सडवा मोहा) नष्ट.*


स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे दि.१८.०५.२०२३ रोजी पो.स्टे.जऊळका हद्दीतील ग्राम किन्हीराजा येथे गावठी भट्टयांमध्ये ३५० लीटरचा सडवा मोहा व ६० लिटर गावठी दारू असा एकूण अंदाजे किंमत ४७ हजार रुपयांचा सडवा मोहा जागेवरच नष्ट करण्यात आला आहे. पो.स्टे. जऊळका येथे सदर प्रकरण दाखल केले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पो.स्टे.शिरपूर, पो.स्टे.धनज, पो.स्टे.आसेगाव, पो.स्टे.जऊळका व पो.स्टे.कारंजा शहर हद्दीत ०८ ठिकाणी अवैधपने चालत असलेल्या गावठी हातभट्टीवर धाड टाकून तब्बल ०१.०५ लाख रुपयांचा मोहा सडवा नष्ट केला आहे. 

      सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.अमर मोहिते, पोनि.सोमनाथ जाधव, स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम यांचे पथक सपोनि.विजय जाधव, पोउपनि.शब्बीर पठाण, पोहवा.किशोर चिंचोळकर, सुनील पवार, गजानन अवगळे, दीपक सोनवणे, पोना.अमोल इंगोले, गजानन गोटे, प्रवीण राऊत, राजेश राठोड, राम नागूलकर, प्रवीण शिरसाट, पोकॉ.निलेश इंगळे, डीगांबर मोरे, संतोष शेनकुडे, शुभम चौधरी, अविनाश वाढे, मपोना.संगीता शिंदे यांनी पार पाडली. 

नागरिकांनी अवैध धंद्याविरोधातील माहिती / तक्रार नियंत्रण कक्ष, वाशिम यांना द्यावी त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments