कारंजा प्रतिनिधी.पोलीस स्टेशन कारंजा शहर जि.वाशिम येथे दि.२२/०४/२३ रोजी अर्जदार राजर्षी प्रमोद महाजन यांनी तक्रार अर्ज दाखल केला की, त्यांची मुलगी धरून दि. १९/०४/२०२३ रोजी शांती नगर कारंजा येथुन निघुन गेली असून तिचा आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन येत नाही. अशा अर्जावरून मिसींग क. १३/२३ प्रमाणे दाखल करून तिचा शोध घेणे कामी मा.पो.नि.श्री. आधारसिंग सोनोने साहेब यांच्या मार्गदर्शनात तपास पथक पोहेकॉ संदीप ब.न. ८९८, पोना. अजय ब.न. १२३०, पोकों मनिष ब.न. १२१३ असे नेमुन अमरावती करीता रवाना करण्यात आले होते. सदर ठिकाणी हरवलेली मुलगी मिळून न आल्याने सदरची मुलगी ही मध्य प्रदेश मध्ये असल्याची गोपनिय माहीती मिळाल्यावरून पुन्हा मा. पोलीस निरीक्षक गजानन धंदर तसेच पो. नि. आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनात दुसरे तपासपथक पोलीस नाईक उमेशकुमार बिबेकर ब. न. १०१७, पोकॉ. नितीन पाटील ब.न. ३३८ महीला पोकों वंदना इंगोले ब. न. १४२८ असे तयार करून मा. पोलीस अधिक्षक बच्चनसिंग साहेब जि.वाशिम यांच्या आदेशाने सदर चे तपास पथक दि. ०३/०५/२३ रोजी मध्य प्रदेश करीता खाना झाले. त्यांनी सदर वी हरवीलेली मुलगी कु.हीचा जिल्हा छिंदवाडा पो.स्टे. परासिया मध्य प्रदेश येथे जावुन कसोशीने शोध घेतला असता हरवीलेली मुलगी ही तिचा कारंजा येथील मित्र याचे सोबत मिळुन आल्याणे त्यांना पो.स्टे. कारंजा शहर येथे आनण्यात आले असता तिचे आई वडील तसेच नातेवाईक यांनी पोलीसांचे आभार मानले. तसेच ईतर ही हरविलेल्या इसमांना पोलीस स्टेशन कारंजा शहर हे कसोशीने शोध घेत आहेत.
सदर कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक बच्चनसिंग साहेब जि. वाशिम, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे साहेब, तसेच पो.नि. आधारसिंग सोनोने, पो. नि. गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक उमेशकुमार बिबेकर ब.न. १०१७, पोकॉ. नितीन पाटील ब.न. ३३८ महीला पोकों वंदना इंगोले ब. न. १४२८ यांनी केली आहे.त्याच्या यशस्वी कार्यवाही बदल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments