मंगरूळपीर तालुक्यातील पिंप्री अवगण येथील स्व.मधुकरराव सपकाळ कनिष्ठ कला व विज्ञान महाविद्यालय येथील कला व विज्ञान या दोन्ही शाखेचा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
मागील दहा वर्षापासून महाविद्यालयाने आपली उज्वल निकालाची परंपरा राखत, मागील दहा वर्षापासून महाविद्यालयाचा निकाल 90 टक्के ते शंभर टक्के पर्यंत लागत आहे. महाविद्यालयाने अनेक उच्च गुणवत्ताधारक शिक्षकांची नियुक्ती केलेली असल्यामुळे त्याचप्रमाणे, नियोजनबद्ध अभ्यासक्रम पूर्ण करून शेवटच्या दोन महिन्यात सराव पेपरची संपूर्ण तयारी करून घेतल्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे उत्कृष्ट यश लाभले आहे व चांगले गुण सुद्धा मिळालेले आहे असे मनोगत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. सर्व विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक वर्गाचे, त्याचप्रमाणे शिक्षकेतर वर्गाने घेतलेल्या मेहनतीबद्दल व संस्थेचे सचिव तथा प्राचार्य सुनिल सपकाळ तथा संस्था अध्यक्ष सुशिल सपकाळ यांनी त्या दिवशी हार्दिक अभिनंदन केले आहे.
0 Comments