
30/5/23 सायंकाळी वेसेस 8 सुमारास सविस्तर वृत्ते असे की कारंजा येथील शनिमंदिर जवळ सोळंके यांच्या घरामधील सिलेंडरने अचानक पेट घेतला त्यांनी ही वार्ता तात्काळ नगरपरिषद अग्निशामक दल यांना फोन द्वारे माहिती दिली. नगरपरिषद कारंजा अग्निशामक दल कारंजा मुख्याधिकारी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सिलेंडर पेट घेत दिसत असल्याने फायर मॅन शुभम झोपड यांनी जीवाची परवा न करता यांनी तात्काळ त्याला वीजविले त्यावेळी त्यांच्या मदतीला चालक चंदू खराटे फायरमॅन अहमद खान व फायरमन नरेंद्र भोयर सिलेंडर वेळेत विझवल्याने पुढील अनर्थ टळला. आणि सुदैवाने जिवंत हानी टळली त्यावेळी तिथे असेल असलेल्या माजी नगराध्यक्ष श्री संजय भाऊ काकडे यांनी शुभमचे विशेष कौतुक केले. व तेथील नागरिकांनी सुद्धा जिगरबाज शुभम झोपाटे व कारंजा नगरपरिषद अग्निशामक दल व सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. कारंजा नगरपरिषद नेहमी तत्पर भावनेतूनच काम करत आहे हे विशेष. आणि वाशिम जिल्ह्यातील एकमेव नगर परिषद कारंजा ही अग्निशामक दल वेळेत पोहोचण्याच्या मध्ये सर्वात पुढे आहे. अशा या नगरपरिषद अग्निशामक दल कारंजा याचा कौतुक करावे तेवढे कमी आहे.
0 Comments