दि 21/5/23 सविस्तर वृत्त असे की अमरावती येथील आपल्या बाईक ने म्हशनी  येथील लग्न समारंभासाठी जाण्यास निघालेल्या बाईक स्वारास कार ने उडविले स्विफ्ट डिझायर कारचा समोरचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यांने समोर येणाऱ्या बाईक स्वारास उडविले  त्यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले  त्याची नावे  उमेश पाताडे वय 32 अमोल पाताडे वय 23 रा दहिपाड रा अमरावती व विजय मनवर वय 53 वापटा   अपघाताची माहिती मिळताच ग्रामपंचायत विळेगाव रुग्णवाहिका व जय गुरुदेव रुग्णवाहिका ही घटना जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय येथे भरती केले. निवासी अधीक्षक भाऊसाहेब लहाने वैद्यकीय अधिकारी आशिष आडे यांनी प्रथमउपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती रेफर केले  त्यावेळी मदतीसाठी सिस्टर मनवर कक्ष सेवक पांडे श्रीगुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख ग्रामपंचायत विळेगाव रुग्णवाहिकेचे सेवक अमोल गोडवे समाजसेवक प्रसन्ना काळबांडे जयदेव रुग्णवाहिकेचे  आशिष वेदांत रुग्णालयाचे शंकर रामटेके. यावेळी त्यांनी मदत केली.