मंगरूळपीर तालुका प्रतिनिधी प्रमोद भगत (भाग१)
रूळपीर शहरात प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटाव (निर्मूलन) मोहीम दिनांक 22 ते 26 मे 2023 पाच दिवस सुरू होती, मात्र शहरातील अनेक चौका - चौकातील मेन रोडला लागून शासकीय जागेवर अनेक अतिक्रमण धारकांनी स्टेचा आधार घेऊन प्रशासनासमोर दंड थोपटून आपले दुकाने हटविली नाही. त्यावर प्रशासन सुद्धा मुग गिळून शांतपणे ऐकून घेऊन त्या अतिक्रमणा पासून पळ काढून घेतला आहे . त्यामुळे शहरातील शेकडो अतिक्रमण धारकांची दुकाने जैसे थे आहेत .
शहरातील अकोला चौक , एसटी स्टँड परिसर , महात्मा ज्योतिबा फुले चौक , डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर , मानोरा चौक आदी. ठिकाणातील अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने अद्यापही काढलेली नाहीत . प्रशासनाला त्यांनी स्टे दाखविले आहेत. मात्र तो स्टे किती दिवसाचा आहे , व त्या स्टेवर किती बाय किती जागा मर्यादित आहे याचा काहीच विचार नाही. अनेक अतिक्रमण धारकांजवळ ८×१० फूट , १०×१० चा स्टे आहे. मात्र त्यांनी त्यांच्या ताब्यात १०×५० , २०×४० फूट आदी. प्रकारची शासकीय जागा ताब्यात आहे . त्याच प्रकारे काहींजवळ स्टे नसून एकमेकांच्या सहकार्याने जपून बसले आहेत.
तरी , संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याची शहानिशा करून संबंधित अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण ताबडतोब काढावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
0 Comments