
रिसोड - येथील स्वामी विवेकानंद सार्वजनिक ग्रंथालयात रविवार, २८ मे रोजी भिमसंग्राम सामाजीक संघटनेची जिल्हास्तरीय सहविचार सभा संपन्न झाली. या सभेला अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. माधव हिवाळे तर प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हाध्यक्ष माजी सैनिक कपिल वाठोरे, जिल्हा सचिव गजानन गवई, जिल्हा महासचिव भिमराव खैरे, जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. भिमराव धांडे, रिसोड तालुकाध्यक्ष निलेश गवई यांची उपस्थिती होती. प्रारंभी अध्यक्ष व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागत समारंभानंतर जिल्हा सचिव गजानन गवई यांची आपल्या प्रास्ताविकातून संघटनेच्या आतापर्यतच्या कार्याचा आढावा विषद केला. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष कपिल वाठोरे यांचा डॉ. माधव हिवाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. हिवाळे यांनी संंघटनेमध्ये विविध पदाधिकार्यांची नियुक्ती करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले. अध्यक्षीय मनोगतातून बोलतांना डॉ. हिवाळे यांची संघटनेचे ध्येयधोरणे विषद केली. ते म्हणाले की, तळागाळातील वंचित घटकांना न्याय मिळण्यासाठी भिमसंग्राम संघटनेची स्थापना करण्यात आली असून संघटनेने विविध समस्या हाताळत अनेकवेळा आंदोलने करुन गोरगरीबांच्या अनेक समस्या सोडल्या आहेत. पदाधिकार्यांनी एकजुटीने व एकदिलाने कार्य करत संघटनेला बळ द्यावे व वंचितांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा असे आवाहन हिवाळे यांनी केले. सभेचे सुत्रसंचालन पवन लाखे तर आभारप्रदर्शन विशाल कळासरे यांनी मानले. सभेला राहुल गायकवाड, उमेश वैद्य, प्रितम घुगे, राजु पडघान, देवा चक्रभुज, अभिमान हिवाळे, माधव अंभोरे, निलेश सपकाळ, बबलु गवई, रामकृष्ण अंभोरे, स्वप्नील लेम्भाडे, कैलास कळासरे आदींची उपस्थिती होती.
0 Comments