सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येत की सोयाबीन बियाणे या वर्षी चांगल्या जातीचे जसे फुले किमया , पिकेव्ही अंबा , फुले संगम., फुले दुर्वा , एम ये यू यस ६१२ , लवकर येणारे js ९३०५ , js ९५६० इत्यादी नवीन वाण चांगलें गुणवत्ता पूर्ण सोयाबीन बियाणे आपले गाव , किव्वा आपले लगतच्या गाव मध्ये आपल्याच शेतकरी बांधव कडे मोठ्या प्रमाणत उपलब्ध आहे ,
बाजारात विविध वाणाचे भाव पाहिले तर त्याचे भाव १३० ते १६० रुपये किलो प्रमाणे उपलब्ध आहे , त्याच गुणवत्तेचे आणि चांगले जातीचे बियाणे आपल्या परिसरातील शेतकरी यांचे कडे ७० ते १०० रुपये किलो ने उपलब्ध आहे ,
जर आपण बियाणे बाजारातून खरेदी न करता आपल्याच शेतकरी बांधव जवळून खरेदी केले तर आपल्याच शेतकरी बांधवाना फायदा होईल , आपणच बियाणे उत्पादक आहोत , आपले पैसे बाजार त न जाता आपल्याच शेतकरी बांधव कडे राहील . बाजारात विविध जातीचे विविध लेबल लावलेले बियाणे आणि आपल्या शेतकरी बांधव कडे असलेले बियाणे गुणवत्ता मध्ये कोणताच फरक नसतो , उलट शेतकरी यांचे कडे बियाण्याची जातीचे खात्रीशीर बियाणे आहे .
तरी शेतकरी बांधव यांना विनंती करण्यात येते सोयाबीन बियाणे बाजारातून खरेदी न करता आपल्याच गावातील कीवा परिसरातील शेतकरी बांधव कडून खरेदी करावे ,
" ऐक मेकास स हा य्य करू अवघे धरू सुपंथ"
तालुका कृषि अधिकारी मंगरूळ पीर
जिल्हा वाशिम

0 Comments