मंगरूळपीर शहरातील दानशूर व्यक्तिमत्व गेले अनेक वर्षापासून वाशिम जिल्हात ख्याती असलेले नंदलाल पवार यांनी उन्हाळ्यातील जनावरांच्या चाऱ्याची टंचाई लक्षात घेऊन मंगरूळपीर येथील गौरक्षणला दिनांक २६ रोजी दोन हजार तर गावातील गाव लगतच्या शेतकऱ्यांना चार हजार कडबा पेंडी दान केली आहे तसेच गरजूंना ५० क्विंटल ज्वारी १० क्विंटल बाजरी मोफत वाटप केली त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे गतकाळात जवळपास सर्वच शेतकरी बाजरी ज्वारी अशी पिके मोठ्या प्रमाणात घेत असल्यामुळे उन्हाळ्यात जनावरांना सहज चारा उपलब्ध होत असे मात्र कालांतराने बाजरी ज्वारी ही पिके काळाच्या ओघात लुप्त झाल्याने शेतकऱ्यांनी त्या नगदी पीक म्हणून सोयाबीनचा पर्याय निवडल्याने सोयाबीन ची लागवड मोठ्या प्रमाणात होते याशिवाय काही शेतकरी ज्वारीची लागवड करतात मात्र बहुतांश शेतकरी हे कंपोस्ट खत मिळावे यासाठी कडब्यावर रोटावेटर फिरवतात तर काहीजण विकतात त्यामुळे ग्रामीण भागांमध्ये जनावरांना उन्हाळ्यामध्ये चारा मिळणे दुरापास्त होते अशा विपरीत परिस्थितीमध्ये जनावरांना सहज चारा उपलब्ध व्हावा व ग्रामीण भागातील पशुधनात मोठी वाढ झाली पाहिजे हा उदात्त हेतू समोर ठेवून गावातील व गावालगाच्या शेतकऱ्यांच्या जनावरांना याशिवाय गौरक्षण मधील जनावरांना मोठ्या प्रमाणात चारा उपलब्ध करून दिला एवढेच नव्हे तर अनेक गरजूंना आपल्या शेतातील 50 क्विंटल ज्वारी व दहा क्विंटल बाजरी धान्याचे मोफत वाटप केले त्यामुळे दानशूर व्यक्तिमत्व पवार यांनी केलेले या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे