दि 4/6/23 सविस्तर वृत्त असे की सदर महाजन कुटुंब हे नाशिक वरून नागपूर जाण्यासाठी निघाले असता लोकेशन 187 पोहा हद्दीत हद्दीतील कारच्या समोर कुत्रा आडवाआल्याने कारचा अपघात झाला. कार णे अक्षरशः तीन-चार पलट्या खाऊन रोडच्या या साईडऊन त्या साईडला गेली. त्यामध्ये कुमारी स्वरा महाजन वय 13 राहणार नागपूर ही गंभीर जखमी झाली व कारमधील कुटुंबातील सर्वांना किरकोळ स्वरूपाचा मार लागला अपघाताची मिळतात तात्काळ लोकेशन समृद्धी हायवे 108 पायलट विधाता चव्हाण डॉक्टर मुब्बशीर हे घटनास्थळी जाऊन जखमी रुग्णाला उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे आणले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ कटारिया मॅडम सिस्टर मनवर कक्षा सेवक देवा कांबळे श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख मास्को सिक्युरिटी निशांत सरदार व समृद्धी रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अजय घोडेस्वार यांनी त्यावेळी मदत केली.
0 Comments