मालेगाव / सुरज अवचार
भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा वाशिम यांच्या अंतर्गत आदरणीय सिद्धार्थ भगत सर यांच्या आदेशाने भारतीय बौद्ध महासभा मालेगाव तालुकाध्यक्ष अनिल तायडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षवासामध्ये धम्म प्रवचन मालिकेचे आयोजन केले आहे ही मालिका दिनांक ३ जुलै २०२३ रोजी यूट्यूब च्या माध्यमातून प्रसारित केली जाणार आहे. आपल्या जीवनामध्ये धम्माचे महत्त्व काय व ते आपण कसे अनुसरले पाहिजे ज्या धम्म बांधवांनी आपले जीवन जगत असताना धम्म आत्मसात करून जीवन वाहून नेले आहे अशा दांपत्यांचा एक अंक प्रसारित केला जाणार आहे आणि त्यांच्या जीवनावर व्याख्यान सुद्धा घेतले जाणार आहे असे वाशिम जिल्ह्यातून एकूण शंभर अंक तयार केले जाणार आहेत या शंभर अंका करिता शंभर दांपत्य यांची निवड करण्यात येणार आहे आणि वर्षवासाचा समारोप कार्यक्रमाच्या नंतर या दांपत्यापैकी ज्यांचे सर्वात उत्कृष्ट कार्य असेल अशा धम्म बांधवांना प्रथम क्रमांक देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची चांदीची प्रतिमा भेट देण्यात येणार आहे. याकरिता प्रवचन मालिकेला सहकार्य करत आहेत संस्कार विभाग प्रमुख वाशिम जिल्हा हरिचंद्र जी पोकळे सर ,गोविंदराव इंगळे, जिल्हा कोषाध्यक्ष देवानंद वाकोडे, मेजर अश्विन खिल्लारे, डिव्हिजन ऑफिसर आकाश इंगळे, दिग्दर्शक कॅमेरा मेन मिलिंद खडसे, शालिग्राम पठाडे, हर्षल इंगोले, बळीराम पट्टेबहादुर, मुकुंद वानखेडे, प्रमोद बलखंडे, सतीश भगत, राहुल वानखेडे, विनोद ठोके, एडवोकेट अमोल तायडे, विजय सोनवणे, माधव खडसे, रजनीकांत वानखडे , निखिल चक्रनारायण, बंडू खंडारे, संतोष तायडे, अजय चोथमल ,व्याख्यान कर्त्या सविताताई खिल्लारे, शीलाताई गायकवाड, सुप्रियाताई सहस्रबुद्धे, शितलताई खिल्लारे, माधुरीताई वानखडे, सागर इंगळे, वंदनाताई गायकवाड, प्रमिलाताई डांगे, आशाताई इंगळे, लक्ष्मीताई सराटे, संगीताताई सरदार, संघमित्रा आठवले, कविता डोंगरदिवे ,ह्या राहणार असून या धम्म प्रवचन मालिकेला प्रत्येक गावातून प्रतिसाद मिळत आहे अशी माहिती मालेगाव तालुकाध्यक्ष अनिल तायडे यांनी दिली आहे.
0 Comments