Ticker

6/recent/ticker-posts

*बबापुर येथे एका ४० वर्षीय शेतकर्यांची आत्महत्या*


वाशिम जिल्ह्यातील कारंजा (लाड)तालुक्यातील कामरगाव ग्राम पंचायत मधील स्थानिक बाबपुर येथे काल एका शेतकऱ्याने कर्जा पाई फाशी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून सरकारच्या शेतकरी उदासीन धोरणाचा आणखी एक बळी ठरल्याने सरकारच्या धोरणाचा पुन्हा फज्जा उडाल्याचे चित्र आहे.सविस्तर वृत्त असे की मौजे कामरगाव हलक्यात येत असलेल्या मौजे बाबापुर येथील शेतकरी हरीश रामभाऊ ठाकरे हे अल्पभूधारक शेतकरी असून आपल्या उदर निर्वाह हा शेती वर करीत होते यावर्षी कांदा पीक घेऊन आपल्या कर्जाची परत फेड करावी असा विचार करीत असताना कांद्याला भाव नसल्याने विकण्याचा प्रश्न निर्माण झाला त्यामुळे लोकांची देणे घेणेआणि बंकेचे कर्ज फेडावे तरी कसे? असा प्रश्न आ आवर्जून उभा झाल्याने अखेर आपली जीवन यात्रा फाशी घेऊन संपवली.त्याच्या परिवारात दोन मुले आणि पत्नी असा आपत्य परिवार आहे .त्याच्या जाण्याने गावात तसेच कामरगाव परिसरात हळहळ व्यक्त केल्या आहे.असे वृत्त आमचे वाशिम जिल्हा प्रतिनिधी विजय खंडार यांनी कळविले ...

Post a Comment

0 Comments