जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गिव्हा कुटे येथे एका इसमासह धारदार शस्त्र वाशिम स्थानिक गुन्हे शाखा ने जप्त करून अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार 19 जून 2023 सोमवार रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा वाशिमच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जऊळका पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम गीव्हा कुटे ता.मालेगावयेथे आरोपी देविदास सखाराम झोंबाडे वय ४१ वर्ष रा. गिव्हा कुटे ता.मालेगाव यास अटक करून आरोपीचे राहते घरून 1400 रू किमतीची तलवार जप्त करण्यात आली आहे.अप न. /२०२३ क.४,२५ भारतीय हत्यार कायदा सहकलम १३५ महा.पोलिस अधिनियम न्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखा पथक सपोनी विजय जाधव, आजिनाथ मोरे,पोना राजेश राठोड, प्रवीण शिरसाट, प्रविण राउत, पोका संतोष शेणकुडे, शुभम चौधरी, तेजस्विनी खोडके, संदिप डाखोरे यांनी केली आहे.
0 Comments