वाशीम.
समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था नांदावी व कायद्याचे राज्य अबाधित राहावे यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सदैव दक्ष असून ‘दृष्टी’ प्रणालीअंतर्गत सातत्याने पेट्रोलिंग करत QR Code स्कॅन केले जातात. त्यामुळे शाळा/महाविद्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने, सराफा लाईन, बँका व इतर संवेदनशील ठिकाणी पोलिसांची पेट्रोलिंग वाढली आहे. त्यामध्ये आणखीन सुधारणा होण्यासाठी नवीन १० मोटारसायकली वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.
वाशिम जिल्हा पोलीस घटकाकरिता मा.पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे कार्यालयाकडून होंडा शाईन कंपनीच्या नवीन १० मोटारसायकली प्राप्त झाल्या असून मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वाहनांना जिपीएस सिस्टीम, पी.ए. सिस्टीम, सायरन, कलर लॅम्प, स्टिक होल्डर ई. साहित्य बसविण्यात आले असून सदर वाहने पेट्रोलिंग करिता सुसज्ज स्थितीत तयार आहेत.
सदर वाहने तयार करणेकामी मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी मोटार परिवहन विभाग पोनि.ब्रम्हदेव शेळके, सपोउपनि.गणेश करोदडे यांनी मेहनत घेतली. सदर वाहनांमुळे संवेदनशील ठिकाणी पेट्रोलिंग करणे सोयीचे होणार असून त्यामुळे गुन्हेगारीवर प्रतिबंध घालता येईल.
0 Comments