Ticker

6/recent/ticker-posts

*पो.स्टे.मालेगाव येथे दाखल विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीस ०२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा.*


 मालेगाव महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारावर अंकुश ठेवत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यातील आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल सातत्याने प्रयत्नशील असते. महिलांवरील अत्याचारातील आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा झाल्यास समाजातील महिलांवर होणाऱ्या अन्याय/अत्याचाराच्या प्रमाणत घट होते.

       त्याच पार्श्वभूमीवर फिर्यादीच्या घरात वाईट हेतूने शिरत फिर्यादीचा हात पकडून विनयभंग केला व कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याच्या धमकी दिल्याने सदर आरोपीविरुद्ध पो.स्टे.मालेगाव येथे अप.क्र.४५/१८, कलम ३५४ अ, ४५२, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये तपास अधिकारी म्हणून पोहवा/५१८, संजय पिंपळकर, तत्कालीन नेमणूक - पो.स्टे.मालेगाव यांनी सदर प्रकरणाचा योग्यरित्या तपास करून मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, मालेगाव यांचे न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध होत असल्याने वि.न्यायालयाने दि.०५.०६.२०२३ रोजी सदर आरोपीस ०२ वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

     सदर प्रकरणी सरकार तर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अॅडव्होकेट श्रीमती सरकटे यांनी कामकाज पाहिले तर पैरवी अधिकारी म्हणून नापोकॉ.नवल चरावंडे, पोहवा.उत्तम शिरूभाऊ यांनी कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून काम केले. आरोपीस शिक्षा झाल्याने सदर प्रकरणातील पिडीतेस न्याय मिळाला आहे.

     मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.मनीषा तायडे, प्रभारी अधिकारी, टी.एम.सी., वाशिमचे पोलीस अधिकारी  व अंमलदार तसेच पो.स्टे.स्तरावरील कोर्ट पैरवी अधिकारी व अंमलदार हे मेहनत घेत असून महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे.

Post a Comment

0 Comments