Ticker

6/recent/ticker-posts

*18 जूलेला गुणवंत विद्यार्थी व त्याना घड़वीणाऱ्या पालकांचा गुणगौरव सोहळा*

कारंजा प्रतिनिधी  म


हाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना व पंचायत समिति शिक्षण विभाग यांचा सयुंक्त विद्यामानाने दि.18 जूले रोजी दुपारी 1 वाजता स्थानिक महेश भवन येथे गुणवंत विद्यार्थी व त्यांचा आई वडीलाचा गुण गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री चंद्रकांत वानखडे जेष्ट पत्रकार व राजकीय समीक्षक आणि प्रमुख मार्गदर्शक मा. अभिजीत वायकोस उपवनरक्षक ( भा.व. से.) व मा. ललितकुमार वरहाडे आणि प्रमुख अतिथि म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी मा. जगदीश पांडे,, मा. कुणाल झालटे तहसीलदार कारंजा, जगदीश करड़े अधिव्याख्याता जिल्हा प्रशिक्षण स्वस्था वाशिम, मा. प्रफुल तोतेवाड गटविकास अधिकारी कारंजा, मा. दिनेशचंद्र शुक्ला पो. नी. कारंजा शहर,, मा. सुनील वानखडे पो. नी. कारंजा.ग्रामीण, मा. श्रीकांत माने गट शिक्षण अधिकारी कारंजा,मा. अशोक इन्नानी अध्यक्ष ब्लुचिप कॉनवेट, मा. अमित शिंदे वंनपरिक्षेत्र अधिकारी कारंजा, मा. अभिजीत राठोड इंजिनियर पुणे, मा. बंडूभाऊ इंगोले जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र बहुजन पत्रकार संघटना वाशिम यांचा उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमा ला विद्यार्थी व पालक वर्ग यांनी जस्तीत जास्त संख्येने हजर राहाण्याचे आवाहन महाराष्ट्र बहुजन संघटना व पंचायत समिति शिक्षण विभाग यांनी केले आहेत....

Post a Comment

0 Comments