वाशिम - सामाजीक कार्यात अग्रेसर असलेल्या भिमसंग्राम सामाजीक संघटनेच्या वतीने सामाजीक कार्यात काम करणार्या समाजसेविका व समाजसेवकांसााठी वर्ष २०२३ साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार व माता रमाई आंबेडकर समाजभूषण स्त्री सन्मान पुरस्कारासाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने याआधी सामाजीक क्षेत्रासह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावणार्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेवून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावर्षी वितरीत करण्यात येणार्या समाजभूषण पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याची शेवटची तारीख ७ ऑगष्ट अशी असून इच्छुकांनी आपले प्रस्ताव मुदतीच्या आत भिमसंग्राम सामाजीक संघटना, शॉप नं. १४, सरकारी दवाखान्यासमोर, अकोला नाका वाशिम या पत्त्यावर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून अधिक माहितीसाठी ९७६५३३२८९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Comments