Ticker

6/recent/ticker-posts

*आंबेडकरी चळवळ गतिमान करणे काळाची गरज;भाऊ भोजने यांच्या सत्कारप्रसंगी पिरिपाचे प्रदेशाध्यक्ष गोपाळरावजी आटोटे गुरूजी यांचे प्रतिपादन*


वाशीम -

स्थानिक सर्किट हाऊस येथे आंबेडकरी चळवळीचे अग्रणी नेते भाई रमेश भोजणे यांचा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

भाई रमेश भोजणे यांनी  सत्तर ऐंशीच्या दशकात आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याचे काम निष्ठापूर्वक केले.दलित मुक्ती सेना, नामांतराच्या आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता.आंदोलनदरम्यान त्यांना अनेकवेळा तुरुंगात जावे लागले.ते एक मानवद्रोही व्यवस्थेचा तुरुंग तोडणारे लढवय्या होते.आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी आंबेडकरी चळवळीसाठी समर्पित केले.कुणावर अन्याय अत्याचार झाला की ते जिवाची पर्वा न करता अन्यायी, अत्याचारी प्रवृत्तीवर  तुटून पडत असत.पण आता परिस्थिती भयावह झाली आहे.आता पुन्हा आंबेडकरी चळवळ गतिमान करणे काळाची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन सत्कारप्रसंगी पिरिपाचे प्रदेशाध्यक्ष गोपाळरावजी आटोटे गुरूजी यांनी केले.

सत्काराला उत्तर देताना भाई रमेश भोजणे यांनी आंबेडकरी चळवळीच्या संदर्भाने अनेक दाखले देत नामांतराचा  काळ आपल्या ओघवत्या शैलीतून उजागर केला.

     दरम्यान कवी अनिल कांबळे,कवी, महेंद्र ताजणे, अनंतकुमार जुमडे, संतोष सरकटे, मेजर डोंगरे आदींनी भाई भोजणेंच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाशझोत टाकला.

सरकार इंगोले यांच्या लेकीच्या मंगल परिणयाला उपस्थित राहू न शकल्याने ही विशेष भेट त्यांनी वाशीम शहराला दिली.ह्या शानदार सत्कार समारंभाचे आयोजन सरकार इंगोले यांनी केले.

समारंभाच्या अध्यक्षस्थानी पीरीपा प्रदेशाध्यक्ष गोपाळरावजी आटोटे गुरूजी होते.सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन आणि आभार सरकार इंगोले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments