*मालेगांव / सुरज अवचार :-*
मालेगाव शहर व तालुक्याच्या वतीने जैन समाजाचा तहसील कार्यालय येथे मूक मोर्चा कर्नाटकातील चिक्कोडीत जैन मुनी श्री १०८ कामनंदी महाराजांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ मालेगांव शहरात येथे मूक मोर्चा काढला दिगंबर जैन मंदिरापासून मुक मोर्चाला सुरवात झाली तसेच दुर्गा चौक चव्हाण डॉक्टर यांच्या दवाखान्यापासून गांधी चौक अग्रवाल प्लॉट समोरून तसेच आठवडी बाजार नवीन बस स्टॉप समोरील तहसील कार्यालय येथे तहसीलदार दीपक पुंड,व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी किशोर काळबांडे साहेब,व लोखंडे साहेब,यांना निवेदन दिले मालेगांव येथील सकल दिगंबर जैन समाज मालेगाव व मालेगाव तालुक्यातील सर्व जैन समाजातर्फे निवेदन देण्यात असे नमुद केली की कर्नाटक राज्यातील हिरेकुठी ता चिक्कोडी जि बेळगाव येथे प.पू.जैन मुनी श्री १०८ कामकुमार नंदीजी महाराज यांची काही समाज कंटकाकडुन अमानुषपणे हत्या करण्यात आली चार्तुमास सारख्या पवित्र दिवसाच्या सुरुवातीलाच अशा प्रकारची कुर घटना म्हणजे अहिंसेच्या मुल तत्वाचीच निर्घुण हत्या होय
या घटनेमुळे संपुर्ण जैन समाजामध्ये तीव्र आकोश असुन सकल दिगंबर जैन समाज मालेगाव मालेगाव तालुक्यातील सर्व जैन समाज कठोर शब्दात या अमानुष घटनेचा जाहीर निषेय करीत तहसिल मार्फत कर्नाटक सरकार ला सांगु इच्छीतो तो की कर्नाटक सरकार ने या घटनेची गांभीर्याने नोंद घेवुन दोषीवर अत्यंत कठोर कार्यवाही करावी अशी विनंती साधु साध्वीच्या असुरक्षिततेत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे जैन समाज हा अल्पसंख्यांक समाज असुन अशा घटनांची पुर्नरावृत्ती होवु नये यासाठी शासनाकडुन साधु साध्वीच्या सुरक्षीतते बाबत शासन निर्णय काढून जैन समाजास न्याय द्यावा अशी निवेदनाद्वारे ही विनंती केली आहे तसेच प्रमुख मार्गावरून मोर्चा पुन्हा जैन मंदिराजवळ आला व मोर्चाचा समारोप झाला समस्त दिगंबर जैन महिला मंडळ,व नवयुक मंडळ, श्रावक श्राविका या मोर्चात उपस्थित होत्या हत्येचा निषेध करून,दोषींवर कठोर कारवाई करावी यासाठी शासनाकडे प्रयत्न करावेत, अशा आशयाचे निवेदन, तहसीलदार दीपक पुंड साहेब यांना दिले.यावेळी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष उद्धवराव गोडे,भगवान बोरकर,भरत घुगे,गजानन शिंदे,गजानन बोरकर,व आदी समस्त ठाकरे गट शिवसैनिक तालुका व शहर उपस्थित तसेच मालेगाव तालुक्यातील समस्त दिगंबर जैन समाज हजारोच्या संख्येने उपस्थित उपस्थित राहून या घटनेचा निषेध व्यक्त करून निवेदन दिले होते.
0 Comments