Ticker

6/recent/ticker-posts

*रस्ता कामासाठी सरपंच गोपीनाथ नागरे यांचे उपोषण*


ब्राह्मणवाडा ते रिधोरा फाटा दोन किलोमीटर रस्ता  पावसामुळे जास्त उघडला आहे त्या रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत प्रवाशांना जाण्याकरिता अडचणीचा सामना करावा लागत आहे या रस्त्यावर कित्येक वेळा छोट मोठ्या गाड्या स्लिप होऊन नागरिक जखमी झाले आहेत या गड्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता वारंवार निवेदन तक्रार देऊन सुद्धा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत आहे लवकरात लवकर या रस्त्याच्या कामाला सुरुवात व्हावी याकरिता डॉ,बाबासाहेब आंबेडकर सभागृह ब्राह्मणवाडा न.मा येथे सरपंच गोपीनाथ शिवाजी नागरे यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे दिनांक 17 जुलै रोजी सभागृहामध्ये उपोषणाला बसले असून आजचा तिसरा दिवस आहे

Post a Comment

0 Comments