पो.स्टे.कारंजा शहर हद्दीत महिनाभरात ०५ वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी व चोरीसारखे गुन्हे घडले होते. त्याप्रकरणी पो.स्टे.कारंजा शहर येथे अप.क्र.४४६/२३, अप.क्र.४९४/२३, अप.क्र.४९५/२३, सर्व कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि तसेच अप.क्र.१५३/२३ व अप.क्र.४९१/२३, सर्व कलम ३७९ भादंवि नुसार गुन्हे नोंदविण्यात आले होते. सदर गुन्ह्यातील एकूण ०५ आरोपींना अटक करून त्यांचेकडून सदर प्रकरणातील तब्बल १,२७,५००/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात कारंजा शहर पोलिसांना यश प्राप्त झाले आहे.
सदर प्रकरणाचा तपास करत असतांना पो.स्टे.कारंजा शहरच्या तपास पथकाने आपले तपास कौशल्य पणाला लावून प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्ह्यात १) पवन राजू चव्हाण, रा.चांदई, ता.मंगरूळपीर, जि.वाशिम ह.मु.शिंदे नगर, कारंजा, २) शिवा रमेश चव्हाण, ३) नितेश रमेश गिरी दोघे रा.तुळजाभवानी नगर, कारंजा, ४) भावेश घनसिंग घनघोल, रा.रविदास नगर, कारंजा व ५) अजय साधुराम रामधानी, रा.दाईपुरा, कारंजा यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्ह्यांची कबुली दिली आहे. सदर आरोपींकडून तब्बल १.२७ लाखांचा चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून पुढील कारवाई व तपास सुरु आहे.
सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक श्री.बच्चन सिंह (IPS), अपर पोलीस अधीक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा श्री.जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि.दिनेशचंद्र शुक्ला, पोउपनि.बि.सी.रेघीवाले, पोहवा.संतोष पाईकराव, गणेश जाधव, मयुरेश तिवारी, पोना.उमेशकुमार बिबेकर, पोकॉ.अमित भगत, नितीन पाटील, गजानन शिंदे यांनी पार पाडली
0 Comments