*जगदिश मानवतकर* ( अध्यक्ष ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना AIBTS )
*वाशिम प्रतिनिधी*
वाशिम - : दिनांक 27-06-2023 ला वाशिम शहरात येत्या 30 जुलै 2023 रोजी संभाजी भिडे यांची सभा आर. ए.कॉलेज ,वाशिम येथे आयोजित केली आहे .ही सभा अश्या प्रकारच्या व्यक्तीची आहे जो संविधान मानत नाही .जो मानुस म्हणतो की,भारतात मनुस्मृती लावा भारतात मनुच राज्य आलं पाहिजे , माझ्या बागेतील आंबे खाऊन मुल होतात,तुकाराम यांच्या पेक्षा मनु श्रेष्ठ आहे , ज्या माणसावर भीम कोरेगाव दंगलीचे गुन्हे आहेत.अश्या माणसाची सभा येत्या 30 जुलै 2023 रोजी वाशिम येथील आर. ए.कॉलेज मध्ये आयोजित करण्यात येत आहे.तरी अश्या जातीयवादी आणि असंविधानक माणसाची सभा वाशिम मध्ये लागल्यास वाशिम ची कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते .म्हणून या संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यास परवानगी नाकारावी . ही सभा आयोजित केल्यास त्या सभेला ऑल इंडिया ब्ल्यु टायगर सेना विरोध करेल.त्या नंतर होणाऱ्या परिणामास आपण आणि पोलीस विभाग जबाबदार राहील .याची आपण नोंद घ्यावी.त्यामुळे या सभेस परवानगी नाकारली जावी असे जगदिश मानवतकर यांच्याकडुन बोल्या जात आहे.
0 Comments