Ticker

6/recent/ticker-posts

*उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय मालेगांव ह्यांचा गलथान कारभार*



*मालेगांव तहसीलदार ह्यांनी लक्ष देण्याची गरज*


*मालेगाव / सुरज अवचार :-*

मालेगांव तालुक्यातील जमिनी मोजणी,नकाशा,फेरफार,अन्य काही महत्वाच्या बाबीसाठी  तालुक्यातील जनतेसाठी उप अधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय मालेगांव हे शासनाच्या वतीने उघडण्यात आले आहे.मात्र तालुक्यातील नागरिकसाठी त्रासदायक व डोक्याला आणि मनाला त्रास देण्याचे काम केले जाते.येते कोणाचे कोणावर नियंत्रण नाही. साध्या साध्या कागद पत्रासाठी दिवसे दिवस चक्करा मारा लागतात.तर तालुक्यातील शेत जमिनी व गावातील आठ ची मापे असो किंवा अन्य कागदपत्र असो किंवा मोजणी असो अशे सर्व प्रकारची कामे  होत असतात.शेत जमीन मोजणी करायची असल्यास येथे रीतसर कागद पत्राची पूर्तता करून अर्ज करावा लागतो. आणि असेल ते शासकीय शुल्क भरून येथे मोजणी केली जाते.शेत जमीन मोजणी करण्यात करिता सुद्धा येथे शासन स्तरावरून अतीतातडी,तातडी व साधी मोजणी अशे तीन प्रकार आहेत.आणि मोजणी करणाऱ्याच्या आवश्यकता नुसार त्याचा शुल्क आकारण्यात येतो.अती तातडी असेल तर तिप्पट,तातडी असेल तर दुप्पट आणि साधारण जो असेल तो शुल्क त्यानुसार मोजणी ची तारीख पण दिली जाते.मात्र काही अती गरजू शेतकरी वर्गाकडून अती तातडीचे पैसे घेऊन सुद्धा महिने महिने उलटून सुद्धा मोजणी केली जात नाही.तर काही कमी शुल्क व तातडीची मोजणीच्या अर्ज मागून करून सुद्धा मोजणी झाली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग पार गोंधळून गेला आहे.कारण जास्त शुल्क भरणारे मागे  राहले आणि कमी शुल्क आणि मोबदला देणारे ची मोजणी झाली. मग जास्त पैसे देऊन फायदा काय असा प्रश्न अती तातडीची मोजणी टाकणाऱ्या तालुक्यांतील जनतेला पडला आहे.

Post a Comment

0 Comments