Ticker

6/recent/ticker-posts

*वाशिम जिल्हा पोलीस हेडकॉटर मधील पोलिसांनी घडवले माणुसकीचे दर्शन*


घटनाक्रम: आपघातात जखमी युवकाला आपल्या वाहनादद्वारे उपजिल्हा  रुग्णालयात कारंजा येथे दाखल केले.

दि 9/7/23 सविस्तर वृत्त असे की सायंकाळी साडेनऊच्या  सुमारास युवक आपल्या टू व्हीलर ने   पिंपरी मोडक येथे आपल्या गावी जात असताना भडशिवनी फाट्यावर असलेल्या खड्ड्यामध्ये टू व्हीलर आदळून तो गंभीर जखमी झाला. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ताफ्यात बंदोबस्तासाठी  असलेल्या नागझरीनवरून परत येत असताना  वाशिम जिल्हा पोलीस हेडकॉटर मधील पोलिसांनी भडशिवनी  फाटा जवळ झालेला अपघात पाहून आपली गाडी थांबून त्या जखमी झालेल्या युवकाला आपल्या  आपल्या पोलीस व्हॅन द्वारे उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले. अत्यंत जखमी अवस्थेत असलेल्या रुग्ण क्षणाचा विलंब लावतात त्याच्या नातेवाईकाचा शोध श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक  रमेश देशमुख  यांनी धोत्रा जाहागीर येथील त्यांचा मित्र  अभिजीत जाधव याला माहिती दिली. त्यांनी तात्काळ त्यांच्या नातेवाईकाला माहिती दिली. पेशंटचे नाव शाम राठोडवय 26 रा पिंपरी मोडक येथील असून त्याचे काही नातेवाईक धोत्रा ( जहागीर ) येथे असतात. अशातच श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशुमख आपल्या  श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेमध्ये पेशंट घेऊन नातेवाईकांना धोत्रा फाटा जवळच थांबण्यास सांगितले व जखमी रुग्णाला घेऊन तात्काळ अमरावती येथे नेले. अशा वेळेस श्री गुरु मंदिर  रुग्णावहीका नातेवाईकाचे काम सुद्धा करते हे या घटनेवरून लक्षात येते.

 उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय चव्हाण यांनी प्रथम उपचार करून  जखमी असलेल्या युवकाला डोक्याला मार जास्त लागल्यामुळे अमरावती येथे रेफर केले त्यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे निवासी अधीक्षक डॉ भाऊसाहेब लहाने त्यांनी त्यांच्यावर उपचार केले मदतीसाठी ब्रदर अंकुश पाटील कक्षाच्या विजय शिरसाठ मास्को सिक्युरिटी महिंद्रा घुडे श्री जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे संचालक अनिकेत भेलांडे संत गाडगेबाबा रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक शुभम भोयर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे  कपिलभाऊ महाजन अविनाश भोयर सागर भाऊ गोगलिया  यांनी त्यावेळेस मदत केली.

Post a Comment

0 Comments